पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धतीत बदल, नव्या वर्षात OTP आवश्यक

स्टेट बँक ऑफ इंडिया

एटीएमच्या माध्यमातून होणारी चोरी रोखण्यासाठी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या स्टेट बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेने नव्या वर्षात एक जानेवारीपासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी अनिवार्य केले आहे. स्टेट बँकेचे डेबिट कार्ड वापरून तुम्ही रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत एटीएममधून पैसे काढले तर तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल. हा ओटीपी एटीएममध्ये टाकल्यावरच ग्राहकांना पैसे मिळतील.

विस्डेनच्या टॉप ५ क्रिकेटर्समध्ये विराट कोहली

दहा हजार आणि त्यावरील रक्कम एटीएममधून काढण्यासाठी ओटीपी अनिवार्य करण्यात येणार आहे. एटीएमच्या माध्यमातून होणारी चोरी गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याला आळा घालण्यासाठीच हा बदल करण्यात येणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. एटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या चोऱ्या रात्रीच्या वेळीच होतात. स्टेट बँकेने केलेल्या एका अभ्यासानुसार एटीएममधील ६८ टक्के चोऱ्या या रात्रीच्या वेळीच होतात, असे दिसून आले. ओटीपीमध्ये ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर आकड्यातील सांकेतिक क्रमांक मिळेल. तो त्यांना एटीएममध्ये टाकावा लागणार आहे. मोबाईलवर आलेला ओटीपी केवळ एका व्यवहारासाठी उपयुक्त असेल. त्याचबरोबर तो काही मिनिटांसाठीच उपयुक्त असेल. जर त्या कालावधीत व्यवहार पूर्ण केला गेला नाही तर त्या ओटीपीचा उपयोग होणार नाही.

खातेवाटपावरून काँग्रेस नेत्यांची नाराजी उघड, मुख्यमंत्र्यांना साकडे

ओटीपी व्यतिरिक्त स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धतीमध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जर तुम्ही स्टेट बँकेच्या एटीएममधून रात्रीच्या वेळी पैसे काढणार असाल, तरच तुम्हाला ओटीपीची गरज लागेल. इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढायचे असतील तर ओटीपीची गरज पडणार नाही, असेही बँकेने म्हटले आहे.