पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खूशखबर! SBI या बँक खात्यावर देत आहे दुहेरी फायदा

एसबीआय

देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) पब्लिक प्रॉव्हिडंट फंडवर (पीपीएफ) बचत खात्याच्या तुलनेत दुप्पट व्याज मिळते. एसबीआयच्या पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यानंतर करात सवलतही मिळते. गुंतवणुकीनंतर खात्याच्या परिपक्वता मुल्यावरही कर मुक्त परतावा मिळतो. विशेष म्हणजे यातील गुंतवणुकीवर कोणती जोखिमही नाही. पीपीएफ खात्याबाबत जाणून घेऊयात..

गुंतवणुकीची मर्यादा- एसबीआयच्या पीपीएफ खात्यामध्ये किमान ५०० रुपये जमा करता येते. एका वर्षांत कमाल १,५०,००० रुपये जमा करु शकता. ही रक्कम एका वर्षांत १२ हप्त्यात जमा करता येते. हे खाते एसबीआयच्या शाखेत सुरु करता येते. यासाठी ऑनलाइन अर्जही करता येऊ शकते.

२०२४ पर्यंत भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था'

कालावधी- पीपीएफ खाते १५ वर्षांत परिपक्व होते. पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यास करात सवलतही मिळते.

व्याजदर- एसबीआयच्या पीपीएफ खात्यावर ८ टक्के दराने व्याज मिळत आहे. १ जानेवारी २०१९ पासून हे दर लागू आहेत. दरम्यान प्रत्येक ३ महिन्यानंतर व्याज निर्धारित केले जाते. हे व्याज दर बचत खात्याच्या तुलनेत दुप्पट आहे.

खात्याचे हस्तांतरण- पीपीएफ खाते एका शाखेतून दुसऱ्या खात्यात किंवा पोस्ट कार्यालयातून बँक किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत हस्तांतरण केले जाऊ शकते. या सेवेसाठी कोणत्याही प्रकारचे शूल्क आकारले जात नाही. 

बीव्हीजी समूहाचे हनुमंतराव गायकवाड यांची १६ कोटींची फसवणूक

वेळेआधी खाते बंद करणे कठीण- सर्वसाधारणपणे १५ वर्षांपूर्वी पीपीएफ खाते बंद करण्याची परवानगी नाही. पण तातडीच्यावेळी ते बंद केले जाऊ शकते. परंतु, ५ वर्षांआधी बंद केले जाऊ शकत नाही.

Union Budget 2019 : आधीच सोने महाग, त्यात सीमाशुल्कात वाढ