पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्टेट बँकेचे गृहकर्ज होणार आणखी स्वस्त

स्टेट बँक ऑफ इंडिया

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी आपले द्वैमासिक पतधोरण जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या स्टेट बँकेने आपल्या कर्जाच्या व्याजदरात अल्प प्रमाणात कपात केली. स्टेट बँकेच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (एमसीएलआर) ०.०५ टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे बँकेचे गृहकर्ज आणखी स्वस्त होणार आहे. दुसरीकडे बँकेच्या मुदतठेवींवरील व्याजदरातही कपात करण्यात आली आहे. १० फेब्रुवारीपासून नवे दर लागू होणार आहेत.

चिनी प्रवाशाला विमानात उलट्या, पुण्यातील नायडू रुग्णालयात हलवले

स्टेट बँकेचा एमसीएलआर ७.९० टक्क्यांवरून ७.८५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात स्टेट बँकेने सलग नवव्यांदा आपल्या एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. त्यामुळे बँकेच कर्जाचे व्याजदर कमी झाले आहेत. गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी हा निर्णय फायद्याचा आहे.

स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काळातही बँकेच्या गृहकर्जाचे व्याजदर आणखी कमी होणार आहेत. रिझर्व्ह बँकेने गुरुवारी जाहीर केलेल्या विविध उपायांचा परिणाम बँकेचा एमसीएलआर आणखी कमी करण्यावर होईल. त्यामुळे येत्या काळात गृहकर्जाचे व्याजदर आणखी कमी होतील.

राहुल गांधींच्या प्रश्नावरील उत्तरावरून लोकसभेत गदारोळ

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने गुरुवारी जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. रेपो दर ५.१५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला.