पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एक ऑक्टोबरपासून SBI देणार 'ही' खास सुविधा, ग्राहकांना होणार लाभ

एक ऑक्टोबरपासून SBI देणार 'ही' खास सुविधा, ग्राहकांना होणार लाभ

भारतीय स्टेट बँक (एसबीआय) आपल्या लघु, मध्यम उद्योग कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि इतर कर्जांवर १ ऑक्टोबरपासून व्याज दर रेपो दराच्या आधारावर आकारेल. बँकेने सोमवारी याची घोषणा केली. याचा ग्राहकांना फायदा होऊ शकतो. 

भारतीय रिझर्व्ह बँकेने चार सप्टेंबरला सर्व बँकांना आपल्या बदलणाऱ्या व्याजदरांच्या कर्जाला रेपो दराशी संलग्नित करण्याची सूचना दिली होती. 

शेअर बाजारात अच्छे दिन; सेन्सेक्स १,३१३ अंकांनी वधारला

एसबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्व बदलणाऱ्या व्याजदरांच्या कर्जांना आम्ही व्याजदराचा बाह्य मानक रेपो दर अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. लघु आणि मध्यम कर्ज, गृह कर्ज आणि इतर किरकोळ कर्जांवर हे व्याज दर दि. १ ऑक्टोबरपासून लागू होतील. 

रिझर्व्ह बँकेने आपल्या बँकांना रेपो दर, तिमाही किंवा सहामाही वित्तीय बिल किंवा फायनान्शिएल बेंचमार्क इंडिया प्रा. लि.द्वारे जारी केलेल्या कोणत्याही बाजार व्याजदर मानकांपैकी एकाला निवडण्याचा पर्याय दिला होता.

... म्हणून कंपनी करात कपात करून फारसा उपयोग नाही