पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ग्राहकांना दिलासा!, SBI ने 'होम लोन' आणखी स्वस्त केले

एसबीआय

देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सोमवारी सर्व प्रकारच्या कर्जांसाठी मार्जिनल कॉस्ट बेस्ड लँडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये १० बेसिस पॉईंटमध्ये कपात केली आहे. नवे दर मंगळवारपासून लागू होणार आहेत. या कपातीनंतर गृह, कार आणि इतर एमसीएलआर आधारित कर्जे स्वस्त होतील.

रघुराम राजन म्हणाले, पीएमओमुळेच देश मंदीच्या फेऱ्यात

चालू आर्थिक वर्षांत एसबीआयने एमसीएलआरमध्ये सलग आठव्यांदा कपात केली आहे. एसबीआयने निवेदनात म्हटले आहे की, फंडाची कमी होत असलेल्या किंमतीचा लाभ ग्राहकांना देण्यासाठी आम्ही एमसीएलआरमध्ये ०.१० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

NEFT सुविधा १६ डिसेंबरपासून २४ तास सुरू

ताज्या कपातीनंतर एसबीआयमध्ये आता एमसीएलआर वार्षिक ७.९० टक्के असेल. जो आतापर्यंत ८ टक्के होता. एसबीआयने म्हटले की, गृह कर्ज आणि कार लोनच्या बाजारात एसबीआयचा २५ टक्के हिस्सा आहे. आरबीआयने मागील आठवड्यात साप्ताहिक आर्थिक आढावा बैठकीत धोरण दर ५.१५ टक्क्यांवर कायम ठेवला होता.

HTLS 2019 : अर्थव्यवस्थेत सुधारणेला आणखी १८ ते २० महिने लागतील - कुमार मंगलम बिर्ला

एमसीएलआरमधील कपातीमुळे व्याजदरही कमी होतात. पण याचा फायदा सर्व कर्ज घेणाऱ्यांना नाही होणार. नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना याचा सर्वांत अधिक फायदा होईल. तर जुन्या कर्जदारांना याचा लाभ घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.