पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्टेट बँकेची ही सेवा १ ऑगस्टपासून मोफत

स्टेट बँक

पैसे पाठविण्यासाठी वापरण्यात येणारी आयएमपीएस सेवा येत्या १ ऑगस्टपासून विनाशुल्क देण्याचा निर्णय स्टेट बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. दहा दिवसांनंतर आयएमपीएसच्या माध्यमातून पाठविण्यात येणाऱ्या पैशांवर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. 

काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सर्वच बँकांनी आरटीजीएस आणि एनईएफटीवरील शुल्क रद्द केले होते. त्यामुळे ग्राहकांना या माध्यमातून एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठविण्यासाठी कोणताही खर्च येत नव्हता. आता स्टेट बँकेने आयएमपीएसवरील शुल्कही रद्द करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ग्राहकांना आपले पैसे डिजिटल पद्धतीने दुसरीकडे पाठविता येणार आहेत.

'या' खेळाडूत धोनीची जागा घेणाऱ्या पंतला टक्कर देण्याची क्षमता

मिळालेल्या माहितीनुसार ३१ मार्च २०१९ रोजी स्टेट बँकेचे सहा कोटी खातेदार इंटरनेट बँकिंगचा वापर करतात. त्याचवेळी १.४१ कोटी ग्राहक हे मोबाईल बँकिंगचा वापर करतात. स्टेट बँकेचे योनो या डिजिटल बँकिंग सेवेचे एक कोटी वापरकर्ते आहेत. आता आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएस हे सर्व मोफत झाल्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक या पद्धतीने व्यवहार करण्याला प्राधान्य देतील आणि या सुविधांचा वापर करणारे वाढतील, असे बँकेने म्हटले आहे.