पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्टेट बँकेकडून कर्जदारांसाठी आनंदाची बातमी!

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून सोमवारी कर्जदारांसाठी आनंदाची बातमी देण्यात आली. बँकेच्या कर्जावरील व्याजदर ०.१० टक्क्याने कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्येही (एमसीएलआर) कपात करण्यात आली आहे.

विक्रम लँडरशी संपर्क का होऊ शकत नाही माहितीये?

बँकेने एमसीएलआरचा दर ८.२५ टक्क्यांवरून ८.१५ टक्के करण्यात आला आहे. एमसीएलआर दर हा किरकोळ स्वरुपाच्या कर्जाच्या व्याजदराशी संबंधित असतो. आता स्टेट बँकेने एमसीएलआर दर कमी केल्यामुळे इतर बँकांकडूनही याचे अनुकरण करण्यात येण्याची शक्यता आहे. यामुळे कर्जदारांचे कर्जाचे हफ्ते कमी होणार आहेत.

स्टेट बँकेकडून मुदत ठेवींच्या व्याजदरातही कपात करण्यात आली आहे. किरकोळ रकमेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात २० ते २५ टक्क्याने तर मोठ्या रकमेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात १० ते २० टक्क्याने कपात करण्यात आली आहे. रेपो दरात कपात झाल्यानंतर बँकेकडे अधिक रोकड उपलब्ध असल्यामुळे बँकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला. 

US Open 2019: नदालच चॅम्पियन, रशियाच्या मेदवेदेववर मात

स्टेट बँक ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. बँकेच्या देशात २२ हजार शाखा आहेत.