पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

स्टेट बँक ऑफ इंडिया

सार्वजनिक क्षेत्रातील देशातील दिग्गज स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या मुदत ठेवींच्या (एफडी) व्याजदरात कपात केली आहे. १० जानेवारीपासूनच मुदत ठेवींचे नव दर अंमलात आले आहेत. ज्या ग्राहकांना या बँकेत मुदत ठेवीमध्ये पैसे ठेवायचे आहेत. त्यांच्यासाठी नवे दर महत्त्वाचे असणार आहेत. स्टेट बँकेकडून १ ते १० वर्षांसाठीच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. व्याजदरामध्ये १५ बेसिस पॉईंटने कपात करण्याचा निर्णय बँक व्यवस्थापनाने घेतला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून महिलेशी शारीरिक संबंध, जामिनास कोर्टाचा नकार

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच स्टेट बँकेने आपल्या काही मुदतीच्या मुदत ठेवींच्या व्याजदरामध्ये कपात केली होती. त्यानंतर तीनच महिन्यांमध्ये पुन्हा एकदा व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

स्टेट बँकेच्या सर्वसाधारण ग्राहकांसाठी मुदत ठेवींचे नवे दर...

कालावधी आणि व्याजदर
सात ते ४५ दिवस - ४.५० टक्के
४६ ते १७९ दिवस - ५.५० टक्के
१८० ते २१० दिवस - ५.८० टक्के
२११ दिवस ते एक वर्षापेक्षा कमी - ५.८० टक्के
१ वर्ष ते दोन वर्षांपेक्षा कमी - ६.१० टक्के
२ वर्षे ते तीन वर्षांपेक्षा कमी - ६.१० टक्के
३ वर्षे ते पाच वर्षांपेक्षा कमी - ६.१० टक्के
५ वर्षे त १० वर्षांपेक्षा कमी - ६.१० टक्के