पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्टेट बँकेकडून बचत खात्यावरील व्याजदरात कपात

स्टेट बँक ऑफ इंडिया

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने त्यांच्याकडील बचत खात्यांवरील आणि मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थव्यवस्थेतील पैशांची उपलब्धता विचारत घेऊन बँकेने हा निर्णय घेतला आहे. आता १ लाख रुपयांपर्यंतच्या बचत खात्यांवरील ठेवींवर ३.५० टक्क्यांऐवजी ३.२५ टक्के इतकेच व्याजदर मिळणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून नवे व्याजदर लागू होणार आहेत. 

नरेंद्र मोदींची भेट अनोखा अनुभव - अभिजित बॅनर्जी

बँकांमधील ठेवींसोबतच मुदत ठेवी आणि मोठ्या ठेवींवरील व्याजदरातही अनुक्रमे १० बेसिस पॉईंट आणि ३० बेसिस पॉईंट इतकी घट करण्यात आली आहे. बॅंकेने आपल्या एमसीएलआर दरातही या आर्थिक वर्षात सहा वेळा कपात केली आहे. याच दराच्या आधारावर स्टेट बँक कर्जावरील व्याजदर आकारत असते. या दरात कपात करण्यात आल्यामुळे बँकेच्या गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यावरील व्याजदर कमी झाले आहे. 

दिवाळीसाठी खरेदी करताय तर 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा

स्टेट बँकेच्या कर्जावरील व्याजदर ८.१५ टक्क्यांवरून ८.०५ टक्के करण्यात आले आहे. १० ऑक्टोबरपासून नवे व्याजदर लागूही झाले आहेत.