पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एसबीआयकडून ग्राहकांना दिवाळी भेट; सहाव्यांदा व्याज दरात कपात

एसबीआय

स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी दिवाळी भेट दिली आहे. एसबीआय बँकेने वर्ष २०१९-२० साठी एमसीएलआरच्या दरात कपात केली आहे. त्यामुळे यापुढे एसबीआय बँकेचे होम लोन, कार लोन, पर्सनल लोन स्वस्त होणार आहे. एसबीआयच्या नव्या दरानुसार, एमसीएलआरचे दर ०.१० टक्क्यांनी घटले आहे. १० ऑक्टोबर म्हणजे उद्यापासून हे नवे दर लागू होणार आहेत. दिवाळीपूर्वी व्याज दरात कपात केल्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

काँग्रेस पक्ष स्वतःची ओळख विसरलाय, राधाकृष्ण विखेंची टीका
  
एसबीआयने एमसीएलआरचे दर ८.१५ टक्क्यांवरुन ८.०५ टक्क्यांवर आले आहे. १० ऑक्टोबरपासून हे नवे दर लागू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर एसबीआयने व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने देखील ग्राहकांना दिवळी भेट दिली आहे. आरबीआयने रेपो दरामध्ये २५ आधार अंकांनी कपात केली. त्यामुळे रेपो दर ५.४० वरुन ५.१५ टक्क्यांवर आला आहे.  

राज ठाकरेंच्या सभास्थळी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य