पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

SBI च्या ग्राहकांना खूशखबर, गृह कर्जाचे व्याज आणखी घटले

स्टेट बँक ऑफ इंडिया

देशातील सर्वांत मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) गृह कर्जाच्या व्याज दरात ०.०५ टक्क्यांची कपात केली आहे. नवे दर हे आजपासून (दि.१० मे) लागू होणार आहेत. यामुळे गृह कर्ज घेणाऱ्या नव्या ग्राहकांच्या ईएमआयचा बोजा थोडा कमी होईल.

एसबीआयने आपल्या निवेदनात म्हटले की, संशोधित कोषाच्या किमान खर्चावर आधारित ऋण दर (एमसीएलआर) ८.५० टक्क्यांवरुन घटून ८.४५ टक्के झाला आहे. त्यामुळे १० मे नंतर ०.०५ टक्क्यांचा फायदा ग्राहकांना मिळेल. एसबीआयने एप्रिलनंतर दुसऱ्यांदा व्याजदरात सूट दिली आहे. यापूर्वी १० एप्रिलला व्याज दर घटवण्यात आले होते. आरबीआयने एप्रिलमध्ये रेपो रेट २५ बेसिस पाँईटने कमी केले होते. 

यापूर्वी एसबीआयने १ मेपासून बचत खात्याच्या ग्राहकांसाठीच्या व्याजदरात बदल केला होता. आता ज्या ग्राहकांचा बँक बॅलन्स १ लाख रुपयापर्यंत आहे. त्यांना ३.२५ टक्के व्याज मिळेल. पूर्वी हा व्याज दर ३.५० टक्के होता. जो ०.२५ टक्क्यांनी कमी झाला आहे. एसबीआयने १ मे पासून मुदत ठेव आणि कमी काळाच्या कर्जाचे व्याज आरबीआयच्या रेपो रेटशी जोडले आहेत.