पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एसबीआयच्या सर्व सेव्हिंग अकाऊंटला झीरो बॅलन्सची सुविधा

एसबीआय

देशातील सर्वांत मोठी बँक एसबीआयने बचत खात्यावरील व्याज दर घटवून ३ टक्के केले आहे. एक लाख रुपयांपासून जास्त शिल्लक असलेल्या ग्राहकांना पूर्वीपासून ३ टक्के दिले जातात. परंतु, बचत खात्यावरील व्याज दर घटण्याचा परिणाम एक लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या खात्यावर पडणार आहे. त्यांचा पूर्वीचा व्याज दर ३.२५ टक्के होता. 

ज्योतिरादित्यांना भाजपात सन्मान मिळणार नाहीः राहुल

एसबीआयने म्हटले की, बँकेने प्रत्येक प्रकारच्या बचत खात्यावरील व्याजदर वार्षिक ३ टक्के केले आहे. त्याचबरोबर एसबीआयने सर्व बचत खातेधारकांसाठी खात्यात किमान शिल्लक रक्कम (मिनिमम बॅलन्स) ठेवण्याचा नियम संपुष्टात आणला आहे. यामुळे आता सर्व बचत खातेधारकांना झीरो बॅलन्सची सुविधा मिळणार आहे. सध्या मेट्रो शहरांतील खातेधारकांना सरासरी ३ हजार रुपये, छोट्या शहरांसाठी २ हजार आणि ग्रामीण खातेधारकांसाठी १ हजार रुपये खात्यात शिल्लक ठेवण्याची मर्यादा होती. अन्यथा त्यांना दंड आकारला जात होता.

<

एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले की, हे शूल्क हटवून एसबीआय ग्राहकांना अधिकाधिक सुविधाजनक बँकिंगचा अनुभव देऊ इच्छिते. बँकेकडे ४४.५१ कोटी बचत खाते आहेत. इतकी बचत खाती देशातील कोणत्याच बँकेकडे नाहीत. बँकेने एसएमएस शूल्कही रद्द केले आहे. 

मंत्री विदेशात जाणार नाहीत, तुम्हीही जाऊ नका, मोदींचा सल्ला

तत्पूर्वी, महिनाभराच्या आत एसबीआयने मुदत ठेवीवरील (एफडी) व्याजदरात दुसऱ्यांदा घट केली आहे. बँकेने ४५ दिवसांच्या कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदरात ०.५० टक्क्यांची कपात केली आहे. नवे दर १० मार्चपासून लागू झाले आहेत.