पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

SBI ने बचतीवर चालवली कात्री, कोट्यवधी ग्राहकांना बसणार झटका

एसबीआय (संग्रहित छायाचित्र)

सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) ग्राहकांच्या बचतीवर कात्री चालवली आहे. एसबीआयने मुदत ठेवीचे (एफडी) व्याज दर घटवले आहेत. हे नवीन दर १० जानेवारीपासून लागू झाले आहेत. बँकेने एक ते १० वर्षांचे एफडी दर १५ बेसिस पाँईंटने घटवले आहेत. तर ७ दिवसांपासून ते एक वर्षांपर्यंतच्या एफडीतील व्याजदरात कोणतेच बदल करण्यात आलेले नाहीत.

PMC बँक आरोपींबाबत हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

यापूर्वी बँकेने एक वर्षांपेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी असलेल्या एफडीच्या व्याजदरात १५ बेसिस पाँईंटची कपात केली होती. आता नवीन एफडीची दरे पुढीलप्रमाणे..

२० मिनिटांचे भाषण ५ मिनिटांत आटोपत मूर्तींनी दिला वक्तशीरपणाचा धडा

१. ७ ते ४५ दिवसांच्या एफडीवरील व्याज दर- ४.५० टक्के
२. ४६ दिवस ते १७९ दिवसांच्या एफडीवर व्याज दर- ५.५० टक्के
३. १८० दिवस ते २१० दिवस आणि २११ दिवस आणि १ वर्षांहून अधिक कमीच्या एफडीवर व्याज दर- ५.८० टक्के.
४. एक वर्ष ते १० वर्षांच्या कालावधीत व्याजदर ६.२५ टक्क्यांवरुन कमी होत ६.१० टक्के करण्यात आले आहे. एसबीआयने या एफडीवरील व्याज दर घटवले आहेत. 
५. एक वर्ष ते २ वर्षांहून कमी, २ वर्ष आणि ३ वर्षांहून कमी, ३ वर्ष आणि ५ वर्षांहून कमी, ५ ते १० वर्षांच्या एफडीवर व्याज दर ६.१० टक्के आहे.

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी