पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

SBIचे ग्राहक ATMमधून एका महिन्यात इतक्या वेळा काढू शकतील मोफत पैसे

एसबीआय (संग्रहित छायाचित्र)

जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियात (एसबीआय) खाते असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे. एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढणे आणि जमा करण्याबाबतचे नियम बदलण्यात आले आहेत. आता एसबीआयचे ग्राहक १२ वेळा मोफत एटीएममधून पैसे काढू शकतील.

१. एसबीआय एटीएममधून १२ वेळा काढता येणार पैसे
एसबीआयच्या एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा वाढवली जाईल. मेट्रो शहरातील ग्राहक एटीएममधून १० वेळा मोफत व्यवहार करु शकतात. तर इतर शहरातील हीच मर्यादा १२ वेळा करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर एसबीआय खात्यात निर्धारित मासिक सरासरी शिल्लक न ठेवल्यास केल्या जाणाऱ्या दंडातही ८० टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. 

बाबासाहेबांच्या महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या : काँग्रेस

२. एसबीआयमधून रोकड काढणे
एसबीआयचे खातेधारक ज्यांची मासिक सरासरी शिल्लक २५००० असते, तो बँकेच्या शाखेतून दोनवेळा मोफत रोकड काढू शकतो.
- २५००० ते ५०००० सरासरी शिल्लक असलेल्या खातेधारकाला १० वेळा मोफत रोकड काढता येईल.
-१००००० रुपयांहून अधिक सरासरी असलेल्या खातेधारकाला शाखेतून रोकड काढण्यासाठी कोणते निर्बंध नाहीत. बँकेच्या शाखेतून १५ वेळा रोकड काढू शकतील.
- मोफत मर्यादा संपल्यानंतर रोकड काढल्यास ५० रुपये अधिक जीएसटी द्यावा लागेल.

धनंजय मुंडे बैठकीला आल्यावर सुप्रिया सुळेंनी अशी दिली प्रतिक्रिया

३. रोकड जमा करण्याची मर्यादा
एसबीआय ३ वेळा मोफत रोकड जमा करण्याची सुविधा एका महिन्यात देते. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहाराला ५० रुपये आणि जीएसटी आकारते.