पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केवळ वेतनातून उत्पन्न असणाऱ्या प्राप्तिकरदात्यांसाठी खूशखबर

प्राप्तिकर

गेल्या आठवड्यात सादर झालेल्या पुढील आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात वैयक्तिक प्राप्तिकरदात्यांसाठी प्राप्तिकर भरण्याचे दोन पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्या प्राप्तिकरदात्यांचे वार्षिक उत्पन्न केवळ वेतनातून आहे. त्यांच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. केवळ वेतनातून उत्पन्न असणारे प्राप्तिकरदाते पुढील काळात कितीही वेळा या दोन पर्यायांपैकी एकाची निवड करू शकतात. ज्या पर्यायातून प्राप्तिकर कमी भरावा लागेल, त्याची निवड ते करू शकतात, असे स्वातंत्र्य त्यांना देण्यात आले आहे. टॅक्समॅनचे उपमहाव्यवस्थापक नवीन वाधवा यांनी ही माहिती दिली. ही सुविधा केवळ वेतनातून उत्पन्न असणाऱ्या प्राप्तिकरदात्यांनाच आहे.

निर्भया प्रकरण : दोषींना एकाचवेळी फाशी द्या, केंद्राची याचिका फेटाळली

ज्या प्राप्तिकरदात्यांचे वार्षिक उत्पन्न व्यापार किंवा व्यवसायातून आहे. त्यांना केवळ एकदाच दोन पर्यायांपैकी एकाची निवड करण्याची संधी मिळेल. उदा. पुढील आर्थिक वर्षात त्यांनी पर्याय क्रमांक एक वापरला आणि त्यानंतरच्या आर्थिक वर्षात त्यांनी दुसऱ्या पर्यायाचा वापर केला तर परत त्यांना कधीही पहिला पर्याय वापरता येणार नाही. त्यापुढील काळात त्यांना कायम दुसऱ्या पर्यायानेच प्राप्तिकर भरावा लागेल, असे नवीन वाधवा यांनी सांगितले.

ज्या प्राप्तिकरदात्यांचे प्रोफेशनमधून (उदा. वकील, डॉक्टर इत्यादी) उत्पन्न आहे. त्यांच्याबद्दल अजून स्पष्टता नाही, असे क्लिअरटॅक्स डॉट इनच्या लेखापाल प्रीती खुराना यांनी सांगितले. या संदर्भात केंद्र सरकार नंतर अधिक स्पष्टपणे माहिती देईल, असे त्यांनी सांगितले.

NZvsIND : टेलरचा शतकी ट्रेलर! वनडेत किवींच्या जिवात जीव...

वैयक्तिक प्राप्तिकरदात्यांसाठी दोन पद्धतीने प्राप्तिकर भरण्याची सुविधा यावेळी जाहीर करण्यात आली आहे. जुन्या पर्यायानुसार जुन्या करदराने प्राप्तिकर भरावा लागेल पण यामध्ये सर्व प्रमाणित वजावटींचा वापर करता येईल. नव्या पर्यायानुसार करदर कमी करण्यात आला आहे. पण यामध्ये निवडकच प्रमाणित वजावटी प्राप्तिकरदात्यांना वापरता येतील.