पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

budget 2020: संरक्षण क्षेत्रात किरकोळ वाढ, ३.३७ लाख कोटींची तरतूद

संरक्षण क्षेत्रात किरकोळ वाढ, ३.३७ लाख कोटींचे वाटप

अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी किरकोळ वाढ करण्यात आली आहे. २०२०-२१ मध्ये यात ३.३७ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर मागील वर्षी ३.१८ लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे लष्कराचे वेगाने अत्याधुनिकरण करण्यासाठी तरतुदीत मोठी वाढ करण्याच्या अंदाजाला तडा गेल्याचे बोलले जात आहे.  

Budget 2020: परवडणारी घरे देणाऱ्या बांधकाम विकसकांना एक वर्षाची 'कर विश्रांती'

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शनिवारी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार संरक्षण क्षेत्रासाठी १.१३ लाख कोटी रुपये भांडवली खर्चासाठी देण्यात आले आहेत. त्याचा वापर नवीन शस्त्रास्त्रे, विमान, लढाऊ विमान आणि इतर सैन्य उपकरण खरेदी करण्यासाठी केला जाईल. 

महसुली खर्चाच्या संदर्भात २.०९ लाख कोटी रुपये खर्च होतील. यामध्ये वेतनावरील खर्च आणि संरक्षण प्रतिष्ठानांच्या देखभालीचा समावेश आहे. एकूण वाटपात निवृत्ती वेतनासाठी वेगळी तरतूद करण्यात आलेल्या १.३३ लाख कोटी रुपयांचा समावेश नाही. तज्ज्ञांच्या मते संरक्षणासाठीची तरतूद ही जीडीपीच्या १.५ टक्के असून ती १९६२ नंतरची सर्वांत कमी आहे. 

Budget 2020 : आधार कार्ड असेल तर अर्जाशिवाय मिळणार पॅन कार्ड

अर्थसंकल्पानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अर्थसंकल्पाचो कौतुक केले. हा अर्थसंकल्प विकासाला पुढे नेईल आणि अर्थव्यवस्थेत पुन्हा मागणी वाढेल, असे म्हटले. हा अर्थसंकल्प गुंतवणुकीसाठी अनुकूल तर आहेच. शिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणारे आणि भारतीय उद्योगांना स्थिर करण्यासाठी महत्त्वाचे सिद्ध होणारे आहे.

निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून २.१ लाख कोटी उभारण्याचे सरकारचे लक्ष्य