पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदी सरकारपुढे आता महागाईचे संकट, काँग्रेसची जोरदार टीका

महागाईचा दर उच्चांकी पातळीवर

आधीच आर्थिक मंदीशी सामना करीत असलेल्या केंद्र सरकारपुढे आता दुहेरी संकट उभे राहिले आहे. डिसेंबरमध्ये देशातील किरकोळ महागाई दराने उच्चांक गाठला आहे. जुलै २०१४ नंतर पहिल्यांदाच देशातील किरकोळ महागाईने उच्चांक गाठल्यामुळे अनेकांचा भुवया उंचावल्या आहेत. किरकोळ महागाईचा दर डिसेंबरमध्ये ७.३५ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.

यवतमाळमध्ये सेनेकडून चतुर्वेदी, बीडमध्ये दौंड यांना NCPची उमेदवारी

फळे आणि भाजीपाला यांच्या किंमतीत झालेली भरमसाठ वाढ, मोबाईलच्या भाड्यामध्ये झालेली वाढ याचा परिणाम किरकोळ महागाईचा दर वाढण्यावर झाला. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारपुढे नवे संकट उभे राहिले आहे. देशातील महागाई आटोक्यात आणण्याला सरकारला प्राधान्य द्यावे लागणार आहे.

आर्थिक विकासाचा दर सप्टेंबर २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीत ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मार्च २०१३ नंतर पहिल्यांदाच विकास दर इतक्या मोठ्या प्रमाणात खाली आला. चालू आर्थिक वर्षात विकासदर पाच टक्केच राहिल, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आधीच म्हटले आहे. भाजीपाल्याच्या दरात ४० टक्क्याने वाढ झाल्यामुळेच महागाईने उच्चांक गाठला असल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. 

मोदी कर्तबगार पण उत्साही भक्तांमुळे अडचणीत,सेनेची स्तुतीसुमने

दरम्यान, या मुद्द्यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर मंगळवारी जोरदार टीका केली. महागाईने उच्चांक गाठला असताना नरेंद्र मोदी त्यावर बोलत का नाहीत, असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी विचारला. भाजप सरकारला महागाई वाढल्याची काहीही पर्वा नाही. खाद्यपदार्थांचे दर उच्चांकी पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. भाजीपाला ६० टक्क्यांनी वाढला आहे. मटण-मासळी १० टक्क्याने वाढली असल्याचे सुर्जेवाला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.