पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

RBI कडून येस बँकेवर निर्बंध, खातेधारकांना पैसे काढण्यावर मर्यादा

येस बँकेला दणका

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी खासगी क्षेत्रातील येस बँकच्या राखीव भांडवलास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. आरबीआयच्या या निर्णयामुळे पुढील आदेशापर्यंत या बँकेतील खातेधारकांना आपल्या खात्यातून केवळ ५० हजार रुपये इतकी रक्कमच काढता येणार आहे. ३० दिवसांसाठी येस बँकेचं संचालक मंडळही निलंबित करण्यात आलं असून एसबीआयचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांची  बँकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

निर्भया प्रकरण : चारही दोषींना २० मार्चला पहाटे फासावर लटकवण्याचे आदेश

अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, गुरुवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून हे निर्बंध येस बँकेला लागू करण्यात आले असून ३ एप्रिलनंतर आरबीआय कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मागील दोन ते तीन वर्षांपासून बँक येस बँकेव कर्जाचा बोजा आहे. बँकेच्या ताळेबंद हा चुकीच्या पद्धतीने दाखवला जात असल्याचेही समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर आरबीआयने बँकेवर निर्बंध घातले आहेत.

भारताकडून पाक लष्करी तळावर हल्ले, पाहा VIDEO

काही महिन्यांपूर्वीच आर्थिक अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने मुंबईतील पीएमसी बँकेवर निर्बंध लादले होते. यावेळी या बँकेतील खातेधारकांमध्ये चांगलाच संताप उसळल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता  येस बँकेवर केलेल्या कारवाईमुळे या बँकेतील ग्राहकांची चिंता वाढली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Reserve Bank of India puts Yes Bank under moratorium Withdrawals have been capped at Rs 50 000