पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँकेवर आरबीआयचे निर्बंध: बँकेचे सर्व व्यवहार ठप्प

पीएमसी बँक

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. बँक आर्थिक डबघाईला आल्याने आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. नवे कर्ज देणे, ठेवी स्विकारणे, गुंतवणुक करणे यासारख्या अनेक व्यवहारांवर आरबीआयने निर्बंध लादले आहेत. 

जैश ए मोहम्मदच्या नावात बदल, नव्या रुपात दहशतवादी कारवायांची तयारी

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेची आर्थिक स्थिती पाहता नागरिकांच्या हितासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. ३५ अ कायद्या अंतर्गत आरबीआयने बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादले आहेत. २३ सप्टेंबर म्हणजे आजपासून पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेला आरबीआयच्या मान्यतेशिवाय कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत.

मिलिंद देवरांचे ते ट्विट, नरेंद्र मोदींचे कौतुक, आणि....

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेला नवे कर्ज देणे, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करणे, नव्या ठेवी स्विकारणे तसंच बँकेकडून गुंतवणूक करणे यांसारख्ये व्यवहार आता बँकेला करता येणार नाही. तसंच, पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या खातेदारांना फक्त १ हजार रुपये ऐवढीच रक्कम काढता येणार आहे. 

साताऱ्यांची पोटनिवडणूक जाहीर, असा आहे निवडणूक कार्यक्रम

आरबीआयने लादलेल्या निर्बंधाच्या काळामध्ये पीएमसी बँकेला कर्मचाऱ्यांचे पगार, जागेचे भाडे, कर, विज बिल, प्रिंटिंग आणि स्टेशनरी, पत्रव्यवहार, कायदेशीर खर्च यासाठी खर्च करता येणार नाही. कर्ज फेडण्यासाठी कर्जदार त्यांच्या ठेवींचा वापर करू शकतात असे आरबीआयने सांगितले आहे. तसंच निर्बंधाचा कालावधी संपल्यानंतर पीएमसी बँकेचा आढावा घेतला जाईल, असे आरबीआयने सांगितले आहे.