पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PMC बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेमध्ये आणखी वाढ

पीएमसी बँक

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतून (पीएमसी) पैसे काढण्यासाठी घातलेली मर्यादा रिझर्व्ह बँकेने मंगळवारी आणखी शिथिल केली. आता पीएमसी बँकेतून खातेदारांना ५० हजार रुपये काढता येणार आहेत. आर्थिक गैरव्यवहारांमुळे रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेतील व्यवहारांवर निर्बंध घातले. पण या निर्बंधांनंतर अनेक खातेदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यापार्श्वभूमीवर टप्याटप्याने रिझर्व्ह बँकेने बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवत नेली आहे.

शिवसेनेच्या प्रस्तावासाठी दरवाजे २४ तास खुले : भाजप

याआधी पीएमसी बँकेतून खातेदारांना ४० हजार रुपये काढता येत होते. त्यामध्ये आता वाढ करण्यात आली आहे. पीएमसी बँकेत आर्थिक अनियमिततेचे प्रकरण समोर आल्यानंतर रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेतील ग्राहकांसाठी पैसे काढण्याची मर्यादा निश्चित करण्याबरोबर बँकेवर अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात आले होते. 

सत्तेचा तिढा सोडविण्यासाठी शिवसेना नेत्याचे मोहन भागवतांना पत्र

रिझर्व्ह बँकेने २३ सप्टेंबरला बँकेवर निर्बंध घातले. त्यावेळी सुरुवातीला पैसे काढण्याची मर्यादा फक्त १००० रुपये इतकीच होती. त्यानंतर टीका सुरु झाल्यावर २६ सप्टेंबरला ही मर्यादा वाढवून १०००० पर्यंत करण्यात आली होती. नंतर ती वाढवून २५००० रुपयांपर्यंत करण्यात आली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Reserve Bank of India enhances withdrawal limit for depositors of Punjab and Maharashtra Cooperative PMC Bank to Rs 50000