पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रिझर्व्ह बँकेकडून NEFT सेवेमध्ये आजपासून मोठा बदल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठविण्यासाठी वापरली जाणारी एनईएफटी सेवा आजपासून (सोमवार) दिवसाचे २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस ग्राहकांना उपलब्ध असणार आहे. रिझर्व्ह बँकेने आधीच याची घोषणा केली होती. १६ डिसेंबरपासून ही सुविधा २४ तास उपलब्ध करण्यात येईल, असे बँकेकडून सांगण्यात आले होते.

चहापानाच्या बहिष्कारावर CM ठाकरेंनी विरोधकांना दिला PM मोदींचा दाखला

एनईएफटीच्या माध्यमातून सकाळी आठ ते संध्याकाळी सात या वेळेतच ग्राहकांना आपल्या खात्यातून ऑनलाईन पद्धतीने दुसरीकडे पैसे पाठवता येत होते. रात्रीच्या वेळी किंवा सुटीच्या दिवशी ही सेवा उपलब्ध नसल्याने अनेक ग्राहकांची अडचण होत होती. त्यामुळे ही सेवा २४ तास सुरु करावी अशी मागणी आधीपासून होत होती. त्याला अखेर सुरुवात होणार आहे.

सर्व बँकांना एनईएफटीच्या माध्यमातून होणारे व्यवहार सुरळीत होण्यासाठी चालू खात्यात पर्याप्त पैसे ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याचबरोबर २४ तास एनईएफटी सुरू झाल्यानंतर ही सुविधा कायम सुरळीत राहावी, यासाठी आपल्या पायाभूत सुविधांमध्ये तातडीने आवश्यक बदल करण्याचे निर्देशही बँकांना देण्यात आले होते.

इम्रान खान सरकारच्या काळात हिंदू असुरक्षित, UNच्या अहवालात खुलासा

एनईएफटी आणि आरटीजीएस या माध्यमातून पाठविण्यात येणाऱ्या पैशांवर कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने आधीच घेतला आहे.