पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जिओचे नवे ऑल इन वन प्लॅन्स सादर, वाचा ग्राहकांना काय मिळणार

रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओकडून सोमवारी ऑल इन वन असे नवा प्लॅन्स बाजारात सादर करण्यात आला. या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा आणि फोन कॉल या दोन्हीचा फायदा होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. एकूण तीन नवे प्लॅन सादर करण्यात आले. यातला पहिला प्लॅन २२२ रुपयांचा आहे.

मुंबई मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती नाही - सुप्रीम कोर्ट

ग्राहकांनी २२२ रुपयांचा प्लॅन घेतल्यास त्यांना रोज २ जीबी डेटा वापरता येईल. त्याचबरोबर जिओ ते जिओ या क्रमांकावर मोफत कॉल करता येतील. जिओ व्यतिरिक्त इतर नेटवर्कवर फोन केल्यास १००० मिनिटांचे बोलणे झाल्यावर ग्राहकांना त्याचे वेगळे शुल्क द्यावे लागेल. ३३३ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना याच सर्व सुविधा दोन महिन्यांसाठी मिळतील. तर ४४४ रुपयांच्या प्लॅनमध्ये तीन महिन्यांची मुदत मिळणार आहे. यामध्येही ग्राहकांना २ जीबी डेटा रोज मिळणार आहे. त्याचबरोबर जिओ ते जिओ मोबाईलवरील फोन कॉल्स मोफत असतील.

'ते काय युध्द लढणार आमच्याशी, जे स्वत: मनाने हारले आहेत'

ग्राहक यापैकी कोणताही प्लॅन निवडल्यानंतर १११ रुपयांचे रिचार्ज करून याच सुविधा एक महिन्यांसाठी वाढवून घेऊ शकतात, असेही कंपनीने स्पष्ट केले. सध्या कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या १.५ जीबी प्लॅनमध्ये सुधारणा म्हणून कंपनीने हे नवीन प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत. कंपनीचे नवे प्लॅन्स आधीच्या २ जीबी प्लॅन्सपेक्षा स्वस्त आहेत.