पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जिओच्या प्लॅनमध्ये मोठा बदल, यापुढे फोन लावला तरी पैसे द्यावे लागणार

रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओच्या नंबरवरून प्रतिस्पर्धी नेटवर्क म्हणजेच एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यांच्या मोबाईलवर फोन केल्यास ग्राहकांना लवकरच सहा पैसे प्रतिमिनिट शुल्क द्यावे लागणार आहे. आतापर्यंत जिओ मोबाईलवरून कोणत्याही नेटवर्कवर किंवा लँडलाईनवर फोन करणे मोफत होते. पण त्यामध्ये बदल करण्यात येणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून इंटरकनेक्ट युसेज शुल्क पूर्णपणे माफ केले जात नाही. तोपर्यंत ग्राहकांना इतर नेटवर्कवर फोन केल्यास त्याचे शुल्क द्यावे लागेल. अर्थात ग्राहकांना त्याबदल्यात तेवढ्याच किमतीचा जास्तीचा डेटाही उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे कंपनीने स्पष्ट केले.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला १७५ जागा मिळणारः अजित पवार

गेल्या तीन वर्षांमध्ये रिलायन्स जिओने इंटरकनेक्ट युसेज शुल्क म्हणून सुमारे १३,५०० कोटी रुपये इतर नेटवर्क कंपन्यांना दिले आहेत. जिओच्या मोबाईलवर सध्या दिवसाला २५ ते ३० कोटी मिस्ड कॉल येतात. जिओवरून इतर नेटवर्कला फोन करणे मोफत असल्यामुळे दुसरे नेटवर्क वापरणारे ग्राहक जिओच्या नंबरवर मिस्ड कॉल देतात. यानंतर जिओच्या नंबरवरून इतर नेटवर्कला प्रतिदिन ६५ ते ७० कोटी मिनिटांचे फोन केले जातात. वास्तविक हे ६५ ते ७० कोटी मिनिटांचे कॉल बाहेरच्या नेटवर्कवरून जिओच्या क्रमांकावर येणारे असायला हवेत. पण तसे होत नाही. त्यामुळेच इंटरकनेक्ट युसेज शुल्क वाढते.

... असे असणार राष्ट्रपती, पंतप्रधानांचे नवे 'एअर फोर्स वन' विमान

जिओ ते जिओ, जिओ ते लँडलाईन त्याचबरोबर इनकमिंग कॉल्स यांच्यावर कोणतेही शुल्क असणार नाही. हे सर्व कॉल्स मोफत असतील, असे रिलायन्स जिओने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर व्हॉट्सऍप, फेसटाईमचा वापर करून केलेले कॉल्सही मोफत असतील, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.