पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Reliance Jio Giga Fiber लाँच: जाणून घ्या टीव्ही, प्लॅन आणि ऑफरची माहिती

रिलायन्स जिओचे होम ब्रॉडबँड सर्व्हिस गिगाफायबर लाँच झाले आहे.

रिलायन्स जिओचे होम ब्रॉडबँड सर्व्हिस गिगाफायबर लाँच झाले आहे. जिओ गीगाफायबरचा प्लान ६९९ रुपयांपासून ते ८,४९९ रुपयांपर्यंत आहे. आरंभीच्या ६९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १०० एमबीपीएसचा स्पीड मिळेल. तर ८४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सला १ जीबीपीएस स्पीड मिळेल. गोल्ड आणि त्यावरील प्लॅनमध्ये टीव्हीही मिळेल. गोल्ड प्लॅनचे मासिक भाडे १२९९ रुपये आहे. तर त्याच्यावरील डायमंड प्लॅन, ज्याला मासिक २४९९ रुपये द्यावे लागतील. प्लॅटिनम प्लॅनचे मासिक भाडे ३९९९ रुपये आहे. टिटॅनियम हा सर्वांत महागडा प्लॅन आहे. याचे मासिक भाडे हे ८९९९ रुपये आहे. या सर्व प्लॅनमध्ये ग्राहकांना 4k स्मार्ट टेलिव्हिजन सेट मिळेल.

अमित शहांचे कौतुक करताना मुकेश अंबानी काय म्हणाले माहितीये?

६९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये काय-काय मिळणार
जिओच्या सुरुवातीचा प्लॅन हे ब्रॉन्झ आहे. यामध्ये ग्राहकाला १०० एमबीपीएस पर्यंत वेग मिळेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा (१०० जीबी+५० जीबी अतिरिक्त) मिळेल. या प्लॅनमध्ये मोफत व्हाईस कॉलिंगचा फायदा मिळेल. म्हणजेच ग्राहकांना भारतात कोणत्याही क्रमांकावर कॉल करता येईल.

८४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये काय-काय मिळणार
८४९ च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना १०० एमबीपीएसचा स्पीड मिळेल. यामध्ये ग्राहकांना अमर्यादित डेट (२०० जीबी+२०० जीबी अतिरिक्त) मिळेल. प्लॅनमध्ये ग्राहकांना मोफत व्हाईस कॉलिंगचा फायदा मिळेल. म्हणजेच ग्राहकांना भारतात कोणत्याही क्रमांकावर कॉल करता येईल.

१२९९ रुपयांचा प्लॅनमध्ये मिळेल मोफत टीव्ही
जिओच्या १२९९ रुपयांच्या गोल्ड प्लॅनमध्ये ग्राहकांना २५० एमबीपीएसची स्पीड मिळेल. प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित (५०० जीबी+ २५० जीबी अतिरिक्त) डेटा मिळेल. ग्राहकांना या प्लॅनमध्ये मोफत व्हाईस कॉलिंगचा फायदा मिळेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 4K स्मार्ट टीव्ही सेट मिळेल.

Jio GigaFiber ग्राहकांना 'फर्स्ट डे, फर्स्ट शो' पाहता येणार

२४९९ रुपयांच्या प्लॅनची माहिती
रिलायन्स जिओच्या २४९९ रुपयांच्या डायमंड प्लॅनमध्ये ग्राहकांना ५०० एमबीपीएसचा स्पीड मिळेल. या प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा (१२५० जीबी + २५० जीबी अतिरिक्त) मिळेल. ग्राहकाला या प्लॅनमध्ये मोफत व्हाईस कॉलिंगचाही फायदा मिळेल. म्हणजेच ग्राहकाला लँडलाईन फोनने देशात कोणत्याही क्रमांकावर फोन करता येईल. २४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २४ इंचाचा एचडी टीव्ही मिळेल.

३९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये १ जीबीपीएसचा स्पीड
रिलयान्सच जिओच्या ३९९९ रुपयांच्या प्लॅटिनम प्लॅनमध्ये ग्राहकाला एक जीबीपीएस स्पीड मिळेल. प्लॅनमध्ये ग्राहकाला अमर्यादित डेटा (२५०० जीबी) मिळेल. या प्लॅनमध्येही व्हाईस कॉलिंगचाही फायदा मिळेल. म्हणजेच ग्राहकाला लँडलाईन फोनने देशात कोणत्याही क्रमांकावर फोन करता येईल. या प्लॅनमध्ये ३२ इंचाचा एचडी टीव्ही मिळेल.

अ‍ॅपल भारतीय ग्राहकांसाठी आणणार स्वस्त आयफोन

८४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये ४३ इंचाचा टीव्ही
जिओच्या ८४९९ रुपयांच्या मासिक प्लॅनमध्ये ग्राहकाला १ जीबीपीएसचा स्पीड मिळेल. या प्लॅनमध्ये ग्राहकाला ४३ इंचाचा 4K टीव्ही मिळेल. या टीव्हीची किंमत ४४९९० रुपये आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकाला एका महिन्यात ५००० जीबी डेटा मिळेल. 

अशी करावी नोंदणी - 
जिओ गीया फायबरसाठी नोंदणी १५ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. ज्या ग्राहकांना या ब्रॉडबँड सर्विसची बुकिंग करायची असेल, ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइट jio.com किंवा My Jio App हून करू शकतात.