पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रिलायन्स जिओफोनसाठी 'ऑल इन वन' प्लॅन लाँच, काय आहे वेगळेपण

रिलायन्स जिओ फोन

अधिकाधिक कॉल्सची सुविधा आणि डेटा असलेला नवा ऑल इन वन प्लॅन जिओकडून शुक्रवारी बाजारात सादर करण्यात आला. जिओ फोनसाठी हे प्लॅन असणार आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ५०० मिनिटांसाठी इतर स्पर्धेक कंपन्यांच्या मोबाईलवर मोफत कॉल करण्याची सुविधाही मिळणार आहे. या प्लॅनमध्ये बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या स्पर्धक कंपन्यांच्या प्लॅनपेक्षा २५ पट अधिक फायदा असल्याचे रिलायन्सने म्हटले आहे.

आदित्य ठाकरे राज्याचे भावी मुख्यमंत्री, वरळीत पोस्टरबाजी

ऑल इन वनमध्ये सर्वा स्वस्त प्लॅन ७५ रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहक जिओ ते जिओ मोफत कॉल करू शकतील. त्यामध्ये इतर कंपन्यांच्या मोबाईलवर कॉलसाठी ५०० मिनिटांचा अवधी दिला जाईल. त्याचबरोबर प्लॅनध्ये ३ जीबी डेटाही दिला जाईल. रोज ०.१ जीबी डेटा रोज वापरता येईल. दुसरा प्लॅन १२५ रुपयांचा आहे. यामध्येही जिओ ते जिओ मोफत कॉल, इतर कंपन्यांच्या कॉलसाठी ५०० मिनिटे आणि १४ जीबी डेटा दिला जाईल. १५५ रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ ते जिओ मोफत कॉल, इतर कंपन्यांसाठी ५०० मिनिटांचा अवधी २८ जीबी डेटा दिला जाईल. तर १८५ रुपयांच्या प्लॅनसाठी जिओ ते जिओ मोफत कॉल्स, इतर कंपन्यांवर कॉल करण्यासाठी ५०० मिनिटे ५६ जीबी डेटा दिला जाईल.

आठवले म्हणतात, रिपाइंला हवं १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्रिपद

भारतातील जिओ फोनच्या ग्राहकांसाठी ही सर्वात चांगली ऑफर असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या आधी हा स्मार्ट फिचर फोन विकत घेऊन तो इतरांना भेट देण्यासाठी कंपनीने तो ८०८ रुपयांना विकण्याची योजना बाजारात आणली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Reliance Jio launches All in One plans for JioPhone users with more data and calling benefits