पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Reliance Jio GigaFiberची प्रतीक्षा संपली, ७०० रुपयांपासून प्लॅन्स

मुकेश अंबानी

Reliance Jio GigaFiber ची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. रिलायन्सने आज आपल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जिओ गिगाफायबर लाँचिगची घोषणा केली. कंपनी जिओ गिगाफायबर जिओच्या तिसऱ्या वर्धापनदिनी म्हणजेच ५ सप्टेंबरला उपलब्ध करुन देणार आहे. जिओ फायबरबाबत कोणकोणत्या घोषणा करण्यात आल्या आहेत याची माहिती जाणून घेऊयात..

मुकेश अंबानींनी केली जिओ फायबरची घोषणा, ५ सप्टेंबरला लाँच

सर्वांत स्वस्त प्लॅन
जिओ गिगाफायबरची सुरुवात ७०० रुपयांपासून होणार आहे. जिओ गिगाफायबरच्या सर्वात कमी किमतीच्या या प्लॅनमध्ये ग्राहकाला १०० एमबीपीएसचा स्पीड मिळेल. 

या पॅकेजमधील सर्वाधिक महागडा प्लॅन हा १० हजार रुपयांचा आहे. कंपनी या किमतीत विविध ग्राहकांना वेगवेगळे प्लॅन ऑफर करत आहे. प्रिमियम प्लॅनमध्ये हाच स्पीड १ जीबीपीएस इतका राहिल.

किती शहरांत मिळणार सेवा

कंपनीने या सेवेची सुरुवात भारतात १६०० शहरामंध्ये देणार आहे. जिओ गिगाफायबर भारतातील ब्रॉडबँड क्षेत्रातील चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास कंपनीला आहे.

व्हॉइस डेटाचेच पैसे द्यावे लागणार

जिओ गिगाफायबर ग्राहकांना हायस्पीड इंटरनेटबरोबर कॉलिंग बेनिफिटही मिळेल. गिगाफायबर ग्राहकांना व्हॉइस किंवा डेटा यापैकी एकाचेच पैसे द्यावे लागतील. फिक्सड लाइनवर कंपनी ग्राहकाला अमर्यादित मोफत कॉलिंगची सुविधा देणार आहे.

आंतरराष्ट्रीय कॉलिंग स्वस्त

कंपनीने आंतरराष्ट्रीय कॉलिंगसाठी एक नवा प्लॅन सादर केला आहे. ५०० रुपयांच्या या प्लॅनमध्ये अमेरिका आणि कॅनडासाठी अमर्यादित मोफत कॉलिंगची सुविधा दिली जाणार आहे.