पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रिलायन्स जिओ फायबर आज होणार लॉन्च; जाणून घ्या कशी करायची नोंदणी

रिलायन्स जिओ फायबर

रिलायन्स जिओ फायबर आज लॉन्च होणार आहे. जिओ फायबरचे इंटरनेट प्लान्स ७०० रुपयांपासून सुरु होणार आहे. अवघ्या ७०० रुपयामध्ये ग्राहकांना सुपरफास्ट इंटरनेट सर्विस मिळणार आहे. जिओ फायबरचा स्पीड १०० एमबीपीएस असणार आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये याबातची घोषणा केली होती. 

गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक जिओ फायबरच्या प्रतिक्षेत आहेत. विशेष म्हणजे जिओ फायबरचा इंटरनट प्लान्स ७०० रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंतच्या दरामध्ये उपलब्ध होणार आहे. जिओ फायबरची बिटा टेस्टींग गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. रिलायन्स कंपनी सुरुवातीला १६०० शहरांमध्ये जिओ फायबर कनेक्शन देणार आहे. या शहरामधील 15 दशलक्ष ग्राहकांनी जिओ फायबरसाठी नोंदणी केली आहे. 

चिदंबरम यांना धक्का, अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला

जिओ गीगा फायबरचे प्लान्स - 
- गीगा फायबर १०० एमबीपीएसच्या स्पीडने सुरु होऊन ते १ जीबीपीएस पर्यंत स्पीडमध्ये उपलब्ध होणार आहे. 
- जिओ फायबरचे प्लान्स ७०० रुपयांपासून सुरु होऊन ते १० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असणार आहे. 
- जिओ फायबर सर्विसचा सर्वात स्वस्त प्लान ७०० रुपयांपासून सुरु होणार आहे. तर टॉप प्लान १० हजार रुपयांपर्यंत असणार आहे. 
- यासोबत व्हॉईस कॉल्स मोफत मिळणार आहे.  
- जिओ फायबरसोबत ओटीटी अॅप्स मिळणार आहे. 
- प्रिमियम जिओ फायबर ग्राहकांना पहिल्याच दिवशी घरामध्ये चित्रपट पहाण्याचा पर्याय मिळणार आहे.

ऑक्टोबरपासून कर्जे आणखी स्वस्त, रिझर्व्ह बँकांचा महत्त्वपूर्ण निर्णय

अशी करावी नोंदणी - 
जिओ गीया फायबरसाठी नोंदणी १५ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. ज्या ग्राहकांना या ब्रॉडबँड सर्विसची बुकिंग करायची असेल, ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइट jio.com किंवा My Jio App हून करू शकतात.