पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढा: रिलायन्सकडून ५०० कोटींची मदत

रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाविरोधातील लढाईसाठी टाटा टॅस्टकडून मदत दिल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ५०० कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. रिलायन्स कंपनीने सोमवारी ही माहिती दिली. याव्यतिरिक्त रिलायन्स कंपनी महाराष्ट्र आणि गुजरात मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी ५-५ कोटींची मदत करणार आहे.

 

विस्थापित कामगारांच्या व्यवस्थेसाठी राज्य सरकारकडून ४५ कोटींचा निधी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानींनी सांगितले की, 'आम्हाला विश्वास आहे की कोरोनो विषाणूच्या आपत्तीवर लवकरात लवकर विजय मिळविला जाईल. रिलायन्स इंडस्ट्रीजची संपूर्ण टीम संकटांच्या या घडीत देशासोबत आहे आणि कोविड -१९ विरूद्ध हा लढा जिंकण्यासाठी सर्व काही मदत करेल.' याआधी रिलायन्स कंपनीद्वारे सीएसआर (कंपनी सामाजिक जबाबदारी) युनिटद्वारे चालविल्या जाणाऱ्या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 

कोरोनाग्रस्ताच्या अंत्यविधीसाठी 'प्रोटोकॉल' पाळावा लागणार

कोरोना विषाणूने देशभरात कहर केला आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कोरोनाविरोधातील लढाईसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व जनतेला मदत करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर उद्योगपती, सेलिब्रिटी, राजकीय नेते यांनी मदतीचा हात पुढे करत कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे. याआधी टाटा ट्रस्टने ५०० कोटींची मदत केली आहे. तर अभिनेता अक्षय कुमारने २५ कोटींची मदत जाहीर केली आहे. 

मुंबईत कोरोनाचा आणखी एक बळी; ७८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू