पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रिलायन्स कम्युनिकेशनला मोठा तोटा, अनिल अंबानींचा राजीनामा

रिलायन्स कम्युनिकेशन

दुसऱ्या तिमाहीत ३०,१४२ कोटींच्या मोठ्या नुकसानीनंतर अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशनच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. अनिल अंबांनींसह मोठ्या पदावर असलेल्या चार इतर अधिकाऱ्यांनीही राजीनामा दिला आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्स दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे आणि कंपनीची मालमत्ताही विकली जाणार आहे. 

बीएसईला दिलेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी यांच्याशिवाय छाया विरानी, रायना करानी, मंजरी केकर आणि सुरेश रंगाचर यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी व्ही. मणिकांतन यांनी फायनान्स विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. 

'एक देश, एकाच दिवशी वेतन' व्यवस्था लवकरच देशात लागू

शुक्रवारी रिलायन्स कम्युनिकेशन्सने दुसऱ्या तिमाहीचा अहवाल जाहीर केला. दुसऱ्या तिमाहीत कंपनीला एकूण ३०,१४२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या अहवालानंतर आरकॉमचे शेअर ३.२८ टक्क्यांनी पडूल ५९ पैसे प्रति शेअर बंद झाले. गेल्यावर्षी दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ११४१ कोटी रुपयांचा फायदा झाला होता.

ऐतिहासिक तोट्यानंतर व्होडाफोन-आयडियाची सरकारकडे मदतीची याचना

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Reliance Communications Anil Dhirubhai Ambani along with four other directors have tendered their resignation from the post