चीनच्या तीन बँकांनी अनिल अंबानी यांच्याविरोधात ६८० मिलियन डॉलर (सुमारे ४७,६०० कोटी) रुपये कर्ज न फेडल्याप्रकरणी लंडनच्या न्यायालयात तक्रार करण्यात आली आहे. इंड्रस्टियल अँड कमर्शियल बँक ऑफ चीन लि. (आयसीबीसी), चीन डेव्हल्पमेंट बँक आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चीनने २०१२ मध्ये अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनला ९२५.२० मिलियन डॉलरचे (सुमारे ६४,७५० कोटी रुपये) कर्ज दिले होते. त्यावेळी अनिल अंबानी यांनी या कर्जाची वैयक्तिक हमी देत असल्याचे म्हटले होते. परंतु, फेब्रुवारी २०१७ नंतर कंपनी कर्ज फेडण्यास अपयशी ठरली.
ऑक्टोबरमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत घट
अनिल अंबानी हे रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष आहेत. रिलायन्स समूह गेल्या काही काळापासून अडचणीतून जात आहे. समूहावर कर्जाचा डोंगर आहे. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 'ब्लूमबर्ग'च्या अहवालानुसार सप्टेंबरपर्यंत रिलायन्स समूहावर १३.२ अब्ज डॉलर (सुमारे ९३ हजार कोटी) कर्ज आहे.
इन्फोसिस कंपनी १० टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ
यापूर्वी रिलायन्स समूहाचा एरिक्सनबरोबरही वाद झाला होता. रिलायन्स कम्युनिकेशनला एरिक्सनचे ५५० कोटी रुपये द्यायचे होते. त्यावेळी ते अडचणीत आले होते.