पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आरबीआयने २००० रुपयांच्या नोटेची छपाई केली बंद

दोन हजार रुपयांची नोट (2000)

आरबीआयने २००० रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली आहे. चालू आर्थिक वर्षांत २००० रुपयांच्या एकाही नोटेची छपाई झालेली नाही. आरबीआयने 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस'ने आरटीआय अंतर्गत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना ही माहिती दिली.

२०१६ मध्ये नोटबंदीनंतर पहिल्यांदा २००० रुपयांची नोद सादर करण्यात आली होती. काळ्या पैशांवर लगाम लावण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा अचानक रद्द केल्यानंतर २००० ची नोट चलनात आली होती. त्यावेळी यावर टीकाही झाली होती. अधिक मूल्याच्या या नोटेमुळे काळ्या पैशाला चालना मिळेल, असे जाणकारांचे मत होते. 

कामगार कपातीची चर्चा फोल?, पारले बिस्किटचा नफा १५ टक्क्यांनी वाढला

आरबीआयने उत्तरादाखल म्हटले की, आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये २००० रुपयांचे ३५४.२९ कोटी नोटा छापण्यात आल्या होत्या. तर २०१७-१८ मध्ये ११.१५ कोटी नोटांची छपाई करण्यात आली. २०१८-१९ मध्ये ही आकडेवारी आणखी कमी होऊन ती ४.६६ कोटीपर्यंत आली. चालू आर्थिक वर्षांत तर एकही नोट छापण्यात आलेली नाही.

मागील आर्थिक वर्षादरम्यान २००० रुपयांच्या नोटेचे चलन खूप कमी झाले. २०१८-१९ मध्ये चलनात असलेल्या २००० रुपयांच्या नोटेच्या संख्येत ७.२ कोटींची तूट नोंदवण्यात आली. मागील वर्षी नव्या २००० च्या नोटांची संख्या ३३६ कोटींनी घटून ३२९ कोटी इतकी झाली. तर ५०० रुपयांच्या नोटेची संख्या आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या १५४६ कोटींच्या तुलनेत २०१८-१९ मध्ये वाढवून २१५१ कोटींपर्यंत नेण्यात आले.

'मनमोहन सिंग, रघुराम राजन यांच्या कार्यकाळातच बँकांना वाईट दिवस'