पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर जैसे थे

शक्तिकांत दास

अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बँकेने गुरुवारी जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात कोणताही बदल केला नाही. रेपो दर ५.१५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षातील हा सहावा पतधोरण आढावा आहे. पतधोरण आढाव्यात चलनवाढीचा दर आटोक्यात असल्याचे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले.

निर्भया बलात्कार प्रकरण : सुप्रीम कोर्टातील उद्याच्या सुनावणीकडे लक्ष

सद्यस्थिती रेपो दरात कोणताही बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे या संदर्भातील रिझर्व्ह बँकेच्या समितीने स्पष्ट केले. रेपो दरावरच विविध बँकांच्या कर्जाचे व्याजदर अवलंबून असतात. रेपो दरात कपात केल्यानंतर बँकांकडून कर्जाचे व्याजदर कमी केले जातात. ज्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक कर्ज घेण्यासाठी उत्सुकता दाखवतात. 

फास्टॅगच्या माध्यमातून कोट्यवधींची चोरी, चौघांना अटक

देशाची आर्थिक स्थिती अद्याप मंदीतून जात असल्याचे बँकेने म्हटले आहे. डिसेंबरमध्ये चलनवाढीच्या दरात वाढ होण्याला कांद्याच्या दरात झालेली अनपेक्षित मोठी वाढ कारणीभूत असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये चलनवाढीचा दर ६.५ टक्क्यांवर वाढलेलाच राहिल, असेही बँकेने म्हटले आहे.