पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रिझव्‍‌र्ह बँक व्याजदरातील कपात कायम राखण्याची शक्यता

रिझर्व्ह बँक

रिझव्‍‌र्ह बँक आपल्या आगामी पतधोरणात रेपो दरामध्ये ०.२५ टक्के घट करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मध्यवर्ती बँकेने गुरुवारी असा निर्णय घेतला तर सातत्याने तिसऱ्यांदा व्याजदर कमी होईल. २०१८-१९ मधील चौथ्या तिमाही आर्थिक वृद्धी दर पाच वर्षांपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे मध्यवर्ती बँक व्याजदर कमी करण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  

अर्थव्यस्थेला धक्का, जीडीपी ७ टक्क्यांच्या खाली तर विकासदर ५.८ %

रिझव्‍‌र्ह बँकचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसीय बैठक ४ जून पासून सुरु होणार आहे. अर्थव्यवस्था सुरळीत चालावी यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेला व्याजदरात अधिक कपात करावी लागेल, असे देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने यापूर्वी आपल्या शोध प्रबंधामध्ये म्हटले होते. भारतीय रिझव्‍‌र्ह बँक गुरुवारी चालू आर्थिक वर्षातील द्विमासिक पत धोरण जाहीर करणार आहे. मागील दोन वेळच्या पतधोरणात रेपो दरामध्ये ०.२५ टक्के इतकी कपात करण्यात आली होती.  

येत्या एक जूनपासून RBI चा नवा नियम, ग्राहकांचा फायदा

भारतीय उद्योग समुहाचे (सीआयआय) के महानिदेशक चंद्रजीत बॅनर्जी यांनी म्हटले आहे की,  अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मध्यवर्ती बँकेला व्याजदरातील कपात कायम ठेवणे गरजेचे आहे. कोटक महिंद्रा बँकेचे अध्यक्ष शांती एकांबरम यांनी व्याज दरात कपात करण्यासाठी सध्याच्या घडीला अनुकूल वातावरण असल्याचे म्हटले आहे. मुबलक प्रमाणात तरलता आणि व्याजदर कपात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.