रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीने गुरुवारी द्विमासिक पतधोरण आढाव्यावेळी मध्यवर्ती बँकेच्या व्याजदरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला. रेपो दर ५.१५ टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. रेपो दरात रिझर्व्ह बँकेकडून गेल्या काही पतधोरण आढाव्यांवेळी सातत्याने कपात करण्यात आली. पण त्याचा नक्की परिणाम काय झाला हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या आहेत. त्याचेही परिणाम काय होताहेत हे पाहावे लागेल. त्यानंतर रिझर्व्ह बँक पुढील निर्णय घेईल, असे स्पष्ट करण्यात आले.
कांद्याच्या दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; संसद परिसरात आंदोलन
रेपो दराच्या साह्यानेच बँक रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेत असतात. तो ५.१५ टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. त्याचवेळी रिव्हर्स रेपो दर ४.९० टक्के आणि बँक दर ५.४० टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी विकासदरच्या अंदाजातही रिझर्व्ह बँकेने बदल केला आहे. आधी विकासदर ६.१ टक्के इतका राहिल, असा अंदाज होता. पण सुधारित अंदाजानुसार तो ५ टक्के इतकाच राहिल, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
बॉयफ्रेंडशी लग्न होऊन ९ दिवस झाले असतानाच तरुणीचा संशयास्पद मृत्यू
पतधोरण समितीच्या सर्व सहा सदस्यांनी एकमताने यावेळी व्याजदरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. पतधोरण समितीला तूर्त व्याजदरात कोणतेही बदल करणे योग्य वाटत नाही. येत्या काळात परिस्थिती नेमकी कशी बदलते हे पाहून पुढील निर्णय घेतला जाईल. महागाई कोणत्याही स्थिती नियंत्रणात राहिल, यावर मात्र पतधोरण समिती प्राधान्याने लक्ष ठेवून असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Monetary Policy Committee has decreased GDP projection from 6.1% to 5% for 2019-20 https://t.co/vNelqlxYG1
— ANI (@ANI) December 5, 2019