पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँकेच्या खातेदारांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा, खात्यातून काढू शकणाऱ्या रकमेत वाढ

पीएमसी बँक

दोन दिवसांपूर्वी आर्थिक निर्बंध घालण्यात आलेल्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ग्राहकांना गुरुवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियान काहीसा दिलासा दिला. पीएमसी बँकेच्या बचत खात्यातून ग्राहकांना आता दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. आधी केवळ एक हजार रुपयेच काढण्याचे निर्बंध बँकेने घेतला होते. त्यामध्ये काहीशी वाढ करण्यात आली आहे. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

पुराच्या पाण्यामुळे पुण्यात गाड्यांचे कोट्यवधींचे नुकसान

पीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादले होते. या बँकेला रिझर्व्ह बँकेच्या परवानगीशिवाय कोणालाही कर्ज वाटप करता येणार नाही. त्याचबरोबर बँकेच्या खात्यातून किती पैसे काढता येतील, यावरही बंधने घालण्यात आली होती. बचत खात्यातून महिन्याला केवळ एक हजार रुपयेच काढण्याला परवानगी देण्यात आली होती. अचानक बँकेवर निर्बंध लादण्यात आल्यामुळे अनेक ग्राहक अडचणीत आले होते. ग्राहकांनी बँकेच्या शाखांसमोर गर्दी केली होती. त्याचबरोबर सर्व पैसे देण्याची मागणी बँकेच्या कर्मचाऱ्याकडे करण्यात आली होती. 

अण्णांकडून पवारांना क्लीनचीट; चौकशीची केली मागणी

रिझर्व्ह बँकेने सविस्तरपणे बँकेच्या आर्थिक स्थितीची पाहणी केल्यावर आपल्या आधीच्या निर्णयात सुधारणा केली असून, आता ग्राहकांना दहा हजार रुपये काढता येणार आहेत. ज्यांनी आधीच एक हजार रुपये काढले आहेत. त्यांना नव्याने नऊ हजार रुपयेच काढता येतील. पुढील सूचना मिळेपर्यंत हेच आदेश कायम राहणार आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसात बँकेतून पैसे काढण्याबद्दलचे नियम शिथिल केल्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:RBI has decided to allow the depositors to withdraw a sum not exceeding 10000 of the total balance held in pmc bank