पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भारतीय अर्थव्यवस्था एका व्यक्तीच्या मर्जीवर चालू शकत नाही'

रघुराम राजन

भारतीय अर्थव्यवस्था गेल्या काही महिन्यांपासून ढासळली आहे. रोज येणाऱ्या ताज्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली नसल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातील आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. देशातील आर्थिक मंदीला जीएसटी आणि नोटाबंदीसारखे निर्णय कारणीभूत असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच भारतीय अर्थव्यवस्था एका व्यक्तीच्या मर्जीवर चालू शकत नाही, असे मत व्यक्त करत त्यांनी मोदींवर टीका केली आहे. 

मरिन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉकद्वारे मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद

अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठात दरवर्षीप्रमाणे ओ. पी. जिंदल व्याखानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेत रघुराम राजन सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, 'भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कोणत्याही एका व्यक्तीने घेतलेला निर्णय हा घातक आहे. वाढती आर्थिक तूट भारतीय अर्थव्यवस्थेला अत्यंत चिंताजनक परिस्थितीकडे नेत आहे.' असे मत त्यांनी व्यक्त केले. 

मुंबईतील चर्नीरोड येथे इमारतीला भीषण आग

तसंच, 'दृष्टीकोनात अनिश्चितता आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत आळशीपणा आल्याचे दिसून येते. रघुराम राजन यांनी यावेळी २०१६ मधील पहिल्या तिमाहीतील जीडीपीच्या आकडेवारीचा देखील उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, २०१६ मध्ये जीडीपी ९ टक्क्यांच्या जवळ होता. त्यामध्ये आता घट झाली असून तो ५.३ टक्क्यांवर आला आहे. नोटाबंदी, जीएसटीसारख्या निर्णयामुळे अर्थव्यवस्था कोलमडली आहे. यातून अर्थव्यवस्था अजूनही सावरलेली नाही.', असे त्यांनी सांगितले.  

'मंदी असती तर चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली नसती'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:rbi former governor raghuram rajan criticizes pm narendra modi and government for economy slowdown