पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

येत्या एक जूनपासून RBI चा नवा नियम, ग्राहकांचा फायदा

संग्रहित छायाचित्र

सध्या ऑनलाईन माध्यमातून पैसे पाठविण्याचे प्रमाण वाढते आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. RTGS च्या माध्यमातून पैसे पाठविण्याचा कालावधी दीड तासांनी वाढविण्यात आला आहे. आता बँक कामकाजाच्या दिवशी RTGS च्या माध्यमातून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पैसे पाठवता येतील. येत्या एक जूनपासून नवीन नियम अंमलात येणार आहे. रिझर्व्ह बँकेने मंगळवारीच ही माहिती जाहीर केली. सध्या RTGS च्या माध्यमातून दुपारी साडेचार वाजेपर्यंतच पैसे पाठवता येत होते.

समजून घ्या बचत खात्यासाठी बँका कोणकोणत्या प्रकारचे शुल्क आकारतात

RTGS च्या माध्यमातून पाठवलेले पैसे लगेचच समोरच्या व्यक्तीच्या खात्यामध्ये हस्तांतरित होत असतात. मोठी रक्कम दुसऱ्यांच्या खात्यांमध्ये पाठविण्यासाठी RTGS चा वापर केला जातो. RTGS च्या माध्यमातून किमान दोन लाख रुपये पाठवता येतात. यासाठी कमाल रक्कम निश्चित करण्यात आलेली नाही. रिझर्व्ह बँकेने अधिसूचना प्रसिद्ध करून RTGS च्या माध्यमातून पैसे पाठविण्याचा कालावधी वाढविण्याचा निर्णय जाहीर केला.

कर्जाचे हफ्ते वेळेत भरले नाही तर काय होते माहितीये?

RTGS च्या सोबत NEFT च्या माध्यमातूनही एका खात्यातून दुसऱ्या खात्यामध्ये पैसे पाठवता येतात. कमी रकमेचे व्यवहार करण्यासाठी NEFT चा वापर केला जातो.