पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रेपो दरात सलग चौथ्यांदा कपात, कर्जे स्वस्त होण्याची शक्यता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

रिझर्व्ह बँकेने बुधवारी रेपो दरात ०.३५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शक्तिकांत दास रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी आल्यानंतर सलग चौथ्यांदा रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या निर्णयानंतर रेपो दर ५.४० टक्के इतका झाला आहे. रेपो दरात कपात केल्यामुळे आता बँकांकडून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विविध स्वरुपाच्या कर्जांच्या व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. बँकेने रिव्हर्स रेपो दर ५.१५ टक्के इतका ठेवला आहे.

कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर; बचावकार्यासाठी नौदल दाखल

रिझर्व्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदरात कपात करण्याचे संकेत आधीच मिळाले होते. अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून रेपो दरात कपात करण्याकडे बघितले जाते. रिझर्व्ह बँकेकडून इतर बँकांना दिला जाणाऱ्या कर्जाच्या व्याजदराला रेपो दर म्हटले जाते. त्यामुळे त्यात कपात झाली की कर्जाच्या व्याजदरात कपात केली जाते. याआधी तीन वेळा रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात पाव टक्क्यांची कपात करण्यात आली आहे.

गेल्या डिसेंबरपासून रेपो दरात मध्यवर्ती बँकेकडून सलग कपात करण्यात आली आहे. पतधोरण आढावा समितीच्या सर्व सदस्यांनी रेपो दरात कपात करण्याच्या बाजूने मत दिल्यानंतर एकमताने रेपो दर ०.३५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन घेतल्यावर अडवाणींच्या डोळ्यात पाणी

गेल्या पतधोरण आढाव्यापासून भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीत फार सुधारणा झालेली नाही. जागतिक मंदीसदृश्य स्थिती, अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध, गुंतवणुकीच्या पातळीवरील निराशा या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असल्याचे समितीने म्हटले आहे.