पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रेपो दरात पुन्हा पाव टक्का कपात, कर्जे आणखी स्वस्त

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

आर्थिक मंदीच्या स्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात पाव टक्क्यांची कपात केली आहे. रेपो दर ५.४० टक्क्यांवरून ५.१५ टक्के इतका करण्यात आला आहे. रेपो दरात कपात केल्यामुळे गृहकर्जासह इतर सर्वच कर्जे स्वस्त होणार आहेत. रिझर्व्ह बँकेने द्विमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर कमी करण्याचा निर्णय घेतला.

तिकीट का मिळाले नाही याचे आत्मपरीक्षण करतोय - विनोद तावडे

रिझर्व्ह बँकेने यंदाच्या वर्षात पाचव्यांदा रेपो दरात कपात केली आहे. रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात केली जाण्याची शक्यता आधीपासूनच वर्तविण्यात येत होती. दोन दिवस रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची बैठक पार पडली. त्यानंतर रेपो दरात कपात करण्याचा निर्णय बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केला. 

रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो दर ४.९० टक्के इतका तर बँक दर ५.४० टक्के इतका ठेवला आहे. रेपो दराच्या साह्यानेच रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना कर्ज देत असते. रेपो दरात कपात केल्यामुळे बँकांकडे अधिक निधी उपलब्ध होत असतो. यामुळे बँका ग्राहकांना जास्तीत जास्त कर्ज देण्यासाठी प्रयत्न करतात. यासाठीच बँकांच्या विविध कर्जांचे व्याजही कमी केले जातात. रेपो दरात पाचव्यांदा कपात करण्यात आल्यामुळे त्याचा फायदा निश्चितपणे देशातील कर्जदारांना मिळणार आहे. कर्जावरील व्याजदर कमी होण्याला मदतच होणार आहे. 

पराग शहांच्या गाडीवर प्रकाश मेहतांच्या समर्थकांचा हल्ला

देशातील महागाईचा निर्देशांक मर्यादित पातळीवर राहिल्यानेच रेपो दरात कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील आर्थिक मंदीची स्थिती दूर करण्यासाठी आणि बाजारात विविध वस्तू आणि सेवांना मागणी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वीच कंपनी करात कपात केली होती. त्याचबरोबर वाहन आणि बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठीही विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.