पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

म्युच्युअल फंड संकटः RBI कडून ५० हजार कोटींची तरतूद

आरबीआय

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) म्युच्युअल फंड कंपन्यांना ५० हजार कोटी रुपयांची विशेष नकदी सुविधा उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. आरबीआयने ही घोषणा फ्रँकलिन टेम्प्लटन म्युच्युअल फंड कंपनीने आपल्या सहा बाँड योजना बंद करण्याची घोषणा केल्यानंतर काही दिवसातच केली आहे. उल्लेखनीय म्हणजे, कोरोना विषाणूमुळे भांडवल बाजारात चढ-उतार होत आहे. पण त्यामुळे म्युच्युअल फंड कंपन्याच्या रोकड स्थितीवर दबाव आहे. 

सर्व वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीस मंजुरी द्या; ऍमेझॉन, फ्लिपकार्टची मागणी

आरबीआयने आपल्या निवेदनात म्हटले की, वाढत्या दबावामुळे म्युच्यअल फंड कंपन्यांना काही बाँड योजना बंद कराव्या लागल्या आहेत. त्यामुळे यावर आणखी नुकसानदायक प्रभाव पडू शकतो. परंतु, हा दबाव मुख्यरित्या जास्तीच्या जोखीमवाल्या बाँड म्युच्युअल फंडपर्यंतच मर्यादित आहे. तर इतर कंपन्या/ योजनांची रोकड स्थिती सामान्य आहे. 

मुंबईतल्या या दोन वॉर्डमध्ये १ हजारांहून जास्त कोरोनाग्रस्त

म्युच्युअल फंड कंपन्यांवर नगदी दबाव कमी करण्यासाठी बँकेने ५०००० कोटी रुपयांची विशेष नगदी सुविधा (ऋण सहायता) उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे, असे आरबीआयने म्हटले आहे. बँक सध्या सतर्क आहे. कोरोना विषाणूचा आर्थिक परिणाम कमी करणे आणि आर्थिक स्थिरता कायम ठेवण्यासाठी हरतऱ्हेचे पाऊल उचलले जाणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

BLOG : कोरोनाच्या युद्धात संयमाने लढा देणारे नेतृत्त्व