पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डिसेंबरपासून NEFT सेवा २४ तास उपलब्ध

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या डिसेंबरपासून २४ तासांपैकी कोणत्याही वेळी एनईएफटीच्या माध्यमातून ग्राहक पैसे पाठवू शकणार आहेत. एनईएफटीवरील शुल्क माफ कऱण्याचा निर्णय बँकेने आधीच घेतला होता. आता २४ तास ३६५ दिवस कोणत्याही वेळी ग्राहकांना कोणत्याही शुल्काशिवाय पैसे पाठविता येऊ शकणार आहेत.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील लाखो कामगारांना एप्रिलपासून कामावरून काढले

सध्या नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (NEFT) या माध्यमातून केवळ कामकाजाच्या दिवशी सकाळी ८ ते संध्याकाळी ७ याच वेळेत पैस पाठविता येतात. दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम एनईएफटीच्या माध्यमातून पाठविता येऊ शकते. डिसेंबर २०१९ पासून २४ तास कोणत्याही वेळी एनईएफटीच्या माध्यमातून पैसे पाठविता येऊ शकणार आहेत.

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेला कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीचा फटका

जूनमध्ये द्वैमासिक पतधोरण आढाव्यावेळी रिझर्व्ह बँकेने एनईएफटी आणि आरटीजीएसवरील शुल्क माफ केले होते. मोठ्या रकमेच्या डिजिटल व्यवहारांसाठी आरटीजीएसचा वापर केला जातो.