पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नव्या वर्षात रेल्वे प्रवासासाठी मोजावी लागणार अधिक रक्कम

रेल्वे (संग्रहित छायाचित्र)

नवीन वर्षात रेल्वे प्रवासासाठी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक पैसा खर्च करावा लागणार आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला रेल्वेने प्रवाशांना दरवाढीचा धक्का दिला. भारतीय रेल्वे प्रशासनाकडून मेल-एक्स्प्रेसच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्यात आली असून  १ जानेवारी २०२० पासून ही भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे.

चुकीला माफी नाही, मराठमोळ्या लष्करप्रमुखांचा पाकला इशारा

वातानुकुलित शयनयानपासून (एसी) ते सामान्य श्रेणीपर्यंत (जनरल) रेल्वे प्रवासासाठी प्रति कि.मी.साठी १ ते ४ पैशांची वाढ करण्यात आली आहे. रेल्वेने उपनगरीय प्रवाशांना दिलासा दिला असून याचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. सामान्य ट्रेनच्या द्वितीय श्रेणीसाठी (नॉन एसी सेकंड क्लास)  शयनयान श्रेणी (स्लीपर क्लास) आणि प्रथम श्रेणीचे भाडे प्रति कि.मी. एका पैशाने वाढविण्याचा निर्णय रेल्व प्रशासनाने घेतला आहे.  मेल-एक्स्प्रेसच्या द्वितीय श्रेणीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति कि.मी. २ पैसे अधिक मोजावे लागणार आहेत. शयनयान आणि प्रथम श्रेणीच्या भाडे शुल्कात प्रति कि.मी. २ पैशांची वाढ करण्यात आली आहे. 

भारताकडून चांद्रयान-३ची घोषणा, २०२० मध्येच पुन्हा मोहिम

मेल-एक्स्प्रेसच्या वातानुकुलित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रति कि.मी. ४ पैसे अधिक मोजावे लागतील. वातानुकुलित चेअर कार, वातानुकुलित ३ टियर, वातानुकुलित २ टियर आणि प्रथम श्रेणीचे भाडे प्रति कि.मी. ४ पैशांनी वाढवण्यात आले आहे.  शताब्दी, राजधानी, दुरंतो यांसारख्या प्रीमियम गाड्यांही भाडेवाढ लागू असणार आहे.