पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

D-Martचे राधाकृष्ण दमाणी भारतातील दुसरे सर्वांत श्रीमंत व्यक्ती

राधाकृष्ण दमाणी

डी-मार्ट (D-Mart) या रिटेल चेन असलेल्या कंपनीचे संस्थापक राधाकृष्ण दमाणी भारताचे दुसरे सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी शिव नाडर, गौतम अदानीसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. दमाणी यांची सुमारे १७.५ अब्ज डॉलर (सुमारे १,२५,००० कोटी रुपये) संपत्ती आहे. दमाणी हे शेअर बाजारातील एक दिग्गज गुंतवणूकदार आहेत. देशातील सर्वांत मोठी श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची संपत्ती ५७.४ अब्ज डॉलर आहे. 

निर्भया प्रकरणः दोषी विनय शर्माचे कारागृहात उपोषण सुरु

फोर्ब्स रिअल टाइम बिलिनियरीज इंडेक्सच्या मते, मागील आठवड्यात एव्हेन्यू सुपर मार्केटचे शेअर मागील आठवड्यात ५ टक्क्यांनी वाढले होते. त्यामुळे दमानी यांच्या नेटवर्थ वाढला. शनिवारी दमाणी यांचे नेटवर्थ १७.८ डॉलरपर्यंत पोहोचले होते. यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत एव्हेन्यू सुपरमार्केटच्या फायद्यात ५३.३ टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. कंपनीने यादरम्यान ३९४ कोटी रुपयांचा फायदा कमावला आहे. श्रीमंत भारतीयांमध्ये त्यांच्यानंतर एचसीएलचे शिव नाडर (१६.४ अब्ज डॉलर), उदय कोटक (१५ अब्ज डॉलर) आणि गौतम अदानी (१३.९ अब्ज डॉलर) यांचे स्थान आहे.

राज्य सरकार भीमा-कोरेगावचा समांतर तपास करणार, लवकरच SIT

भारताचे वॉरेन बफे
६५ वर्षांचे दमाणी २००२ मध्ये रिटेल बिझनेसमध्ये उतरले आणि मुंबईत पहिले स्टोअर सुरु केले. आता त्यांचे २०० स्टोअर असून सुमारे १.५ लाख कोटी मार्केट कॅपिटल आहे. भारताचे वॉरेन बफे समजले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे ते मेंटॉरही आहेत. मार्च २०१७ मध्ये एव्हेन्यू सुपरमार्केटचा आयपीओ आल्यानंतर त्यांना भारताचे रिटेल किंग म्हटले जाऊ लागले. त्यांनी २००२ मध्ये मुंबईतील एका उपनगरात स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात केली होती.

इंदुरीकरांचे कीर्तन जनप्रबोधनासाठी, एका वाक्यानं वाईट ठरवू नकाः चंद्रकांत पाटील

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Radhakrishna Damani founder of D Mart become second richest man of india beat Shiv Nadar Gautam Adani