पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इथं १० रुपयात उघडा खातं, सेव्हिंग अकांऊटपेक्षा मिळेल जास्त व्याज

बचत

बहुतांश लोक दैनंदिन खर्चातून काही पैसे वाचवून घरातील गल्ल्यात किंवा बचत खात्यात ठेवतात. पण हेच पैसे योग्य ठिकाणी गुंतवून त्यातून योग्य परतावाही मिळवला जाऊ शकतो. मासिक बचतीवर चांगल्या परताव्यासाठी पोस्ट कार्यालयात रिकरिंग डिपॉजिट (आरडी) पर्याय निवडता येऊ शकतो. पोस्ट कार्यालय आरडीसाठी ७.३ टक्के व्याज देत आहे. पगारदार आणि महिलांसाठी पोस्टात मंथली सेव्हिंग स्किम म्हणजेच आरडीचा पर्याय ठरु शकतो. येथे चांगला परतावा मिळू शकतो. 

येथे मिळत आहे चांगला परतावा
पोस्टाच्या आरडीला वार्षिक ७.३ परतावा व्याज मिळत आहे. दुसरीकडे एसबीआय, देना बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, अलाहाबात बँक आणि आंध्रा बँक हे १ वर्ष ते ५ वर्षांपर्यंत ६.५ टक्के ते ७ टक्के व्याज देत आहे. म्हणजेच बँकांपेक्षा अधिक पोस्टाच्या रिकरिंगमधून मिळत आहेत. येथे बँकेच्या बचत खात्यात ४ ते ४.५ टक्केपर्यंत व्याज मिळते. 

१० रुपयात उघडलं जातं खातं
पोस्टात आरडीचे खाते अवघ्या १० रुपयात सुरु करता येते. या खात्यात दर महिना किमान १० रुपये आणि त्याहून जास्तीत जास्त कितीही रक्कम जमा करु शकता.

कशी फायदेशीर आहे ही स्किम
तुम्ही तुमच्या खर्चातून काही ना काही बचत करुन या योजनेत दररोज १०० रुपये गुंतवू शकता. यानुसार तुमची महिन्याला ३००० रुपयांची आरडी होईल. म्हणजे तुमची ५ वर्षांत सुमारे १.८० लाख रुपये गुंतवणूक होईल. ५ वर्षांनंतर सुमारे २.२० लाख रुपयांचा फंड तयार होईल. म्हणजेच ५ वर्षांत एकून जमा रकमेवर सुमारे ३७.५११ रुपये व्याज मिळेल. 

ऑनलाइन करु शकता पेमेंट
पोस्टाने ही सुविधा इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (आयपीपीबी) माध्यमातून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना एकदाच पोस्टात जाऊन आरडीचे खाते आयपीपीबीशी लिंक करावे लागेल. त्यानंतर आयपीपीबी खात्यावरुन ऑनलाइन किंवा आयपीपीबी अॅपमधून आरडीचा मासिक हप्ता दिला जाऊ शकतो.