पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाईपलाईनद्वारे पुरवला जाणारा घरगुती गॅस, सीएनजी होणार स्वस्त

सरकारने देशात उत्पादित नैसर्गिक गॅसच्या विक्री मुल्यात मंगळवारी २६ टक्क्यांची मोठी कपात केली आहे.

सरकारने देशात उत्पादित नैसर्गिक गॅसच्या विक्री मुल्यात मंगळवारी २६ टक्क्यांची मोठी कपात केली आहे. २०१४ नंतर घरगुती गॅसच्या मूल्य निर्धारण फॉर्म्युलाला सुरुवात केल्यापासूनची ही सर्वांत मोठी कपात आहे. नैसर्गिक गॅसचे दर घटल्यानंतर सीएनजी, पाईपच्या माध्यमातून घरापर्यंत जाणाऱ्या गॅसचे दरही कमी होतील. यामुळे ओएनजीसीसारख्या गॅस उत्पादक कंपन्यांचा महसूल कमी होण्याची मोठी शक्यता आहे. 

छोट्या सरकारी गुंतवणूक योजनांवरील व्याजदरात मोठी कपात

२०१४ नंतर दुसऱ्यांदा सर्वांत घसरण

पेट्रोलियम मंत्रालयाने म्हटले की, भारतात निर्मित होणाऱ्या सध्याच्या गॅस उत्पादनाच्या मोठ्या हिश्श्याचे दर एक एप्रिलपासून पुढील सहा महिन्यांसाठी  २.३९ डॉलर प्रति दहा लाख ब्रिटिश थर्मल यूनिट (एमएमबीटीयू) होईल. यापूर्वी हे दर ३.२३ डॉलर प्रति दहा लाख एमएमबीटीयू इतके होते. वर्ष २०१४ नंतर ही सहा महिन्यातील ही दुसरी मोठी घसरण आहे. वर्ष २०१४ मध्ये मोदी सरकारने नैसर्गिक गॅसचे दर निश्चित करण्यासाठी एका नव्या फॉर्म्युलाला मंजुरी दिली होती. त्याचबरोबर खोल समुद्रातून काढण्यात येणाऱ्या गॅसचे दरही ८.४३ एमबीटीयूवरुन ५.६१ डॉलरवर आले आहे. 

सार्वजनिक क्षेत्रातील सहा बँका आजपासून इतिहासजमा, अन्य बँकात विलिनीकरण

१ एप्रिल आणि १ ऑक्टोबरला निश्चित होतात दर

नैसर्गिक गॅसचे दर प्रत्येकवर्षी १ एप्रिल आणि १ ऑक्टोबरला निश्चित केले जातात. नैसर्गिक गॅसचा वापर उर्वरक आणि वीज उत्पादनात केला जातो. याचा वापर सीएनजी बनवण्यासाठीही केला जातो. याचा वापर वाहनात इंधन म्हणून केला जातो. घरात स्वयंपाक करण्यासाठीही पाईपच्या माध्यमातून सीएनजीचा पुरवठा केला जातो. 

कोविड १९ चाचणी मोफत करा, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ओएनजीसीचे उत्पन्न होणार कमी

नैसर्गिक गॅसच्या दर कपातीचा परिणाम त्यांच्या उत्पादक कंपनीच्या महसुलावर पडत आहे. देशात ओएनजीसी नैसर्गिक गॅसची सर्वांत मोठी उत्पादक कंपनी आहे. यापूर्वी एक ऑक्टोबरला नैसर्गिक गॅसचे दर १२.५ टक्क्यांनी घटून ३,२३ टक्के प्रती एमएमबीटीयू करण्यात आले होते. कठीण क्षेत्रातून काढल्या जाणाऱ्या नैसर्गिक गॅसचे दरही ९.३२ डॉलरच्या सार्वकालिक उच्च स्तरावरुन घटून ८.४३ डॉलर प्रती पिंपावर आले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गॅसचे दर घटल्यामुळे ओएनजीसीची कमाई ३००० कोटी रुपयांपर्यंत कमी होऊ शकते. तर रिलायन्स इंडस्ट्रिज आणि त्यांची भागीदार कंपनी बीपीपीएलसीचे उत्पन्नही घटू शकते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PNG CNG cheaper 26 percent cut in natural gas price cooking driving cheaper in new Financial Year