पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा; ५० हजार रुपये काढता येणार

पीएमसी बँक

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्यामुळे या बँकेच्या खातेधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशामध्ये या खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खातेधारकांना आता खात्यातून ५० हजार रुपये काढता येणार आहे. भाजपचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी बुधवारी ट्विट करत ही माहिती दिली.

 

निकालाआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथांच्या चरणी

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत सांगितले की, 'पीएमसी बँकेचे खातेधारक आता अतिरिक्त ५० हजार रुपये काढू शकतात. शिक्षण, आजारपण यांरासख्या अत्यावश्यक गरजेसाठी त्यांना पैसे काढता येणार आहे. पण त्यासाठी बँकेला पूरावा द्यावा लागणार आहे. पैसे काढण्यापूर्वी त्यांना बँकेच्या शाखेत अर्ज दाखल करवा लागणार आहे. आजारपणासाठी लागणाऱ्या खर्चाबाबत डॉक्टरांनी दिलेल्या अंदाजित खर्चाची माहिती त्यांना बँकेला द्यावी लागणार आहे. त्यासाठी त्यांना मेडिकल सर्टिफिकेट, मेडिकल रिपोर्ट आणि मेडिकल बिल बँकेच जमा करावे लागणार आहे. 

साताऱ्याच्या निकालाला १२ तासांहून अधिक वेळ लागणार

पीएमसी बँकेतील घोटाळ्यानंतर  आरबीआयने पीएमसी बँकेवर निर्बंध लादले. त्यामुळे खातेधारकांना बँकेतून जास्त पैसे काढणे कठीण झाले आहे. आरबीआयने सुरुवातीला पैसे काढण्याची मर्यादा १ हजार रुपये केली होती. ती वाढवून १० हजार रुपये करण्यात आली. खातेधारकांनी याविरोधात आंदोलन केल्यानंतर ती मर्यादा वाढवून २५ हजार करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा पैसे काढण्याची मर्यादा वाढवत ४० हजार रुपये करण्यात आली. 

'प्रियांका गांधी काय म्हणतात याला काही किंमत नाही'