पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Good News: नोकरी गेल्यानंतरही पीएफ खाते सुरु राहणार

पीएफ

ईपीएफओने पीएफच्या अंशधारकांना मोठा दिलासा दिला आहे. नव्या नियमानुसार नोकरी गेल्यानंतरही ग्राहकाचे पीएफ खाते पूर्वीप्रमाणेच सुरु राहिल. इतकेच नव्हे तर अंशधारक नोकरी गेल्यानंतर एक महिन्यानंतर आपल्या पीएफ खात्यातून ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकतो. जर तीन महिन्याच्या आत नोकरी मिळाली नाही तर खात्यातील उर्वरित २५ टक्के रक्कम काढून खाते बंद करता किंवा चालू ठेवता येऊ शकते. अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती केल्यानंतर हा अधिकार अंशधारकाला देण्यात आला आहे.

PF वरील व्याजदर कमी करण्याची अर्थ मंत्रालयाची मागणी

कर्मचारी भविष्य निधी संघटनेने अंशधारकांना सुलभरित्या खाते हाताळण्याचे अधिकार दिले आहेत. पहिल्या एक वर्षांनंतर पीएफ खात्यातील जमा रक्कम अडव्हान्स देण्याचा पर्याय होता. पण आता नोकरी गेल्यानंतर एक महिन्याच्या आतही रक्कम काढण्याचा अधिकार देण्यात आला आहे. ७५ टक्के पैसे काढण्यासाठी खातेधारकाला उर्वरित २५ टक्के रकमेवर व्याज मिळत राहिल.

सर्वसामान्यांना धक्काः पीपीएफ, सुकन्या समृद्धीच्या व्याजदरात कपात

यावर तीन वर्षांपर्यंत व्याज मिळेल. त्यानंतरही खाते सुरु राहिल पण व्याज मिळणार नाही. ईपीएफओने आधारशी लिंक यूएएनमध्ये जुने खाते ट्रान्सफर करण्यासाठी फॉर्म १३ भरण्याची अनिवार्यता संपुष्टात आणली आहे. 

प्राप्तिकर परताव्याच्या बनावट ईमेल्सचा सुळसुळाट, सावध राहण्याचे आवाहन