पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशातील या राज्यात कोविड-१९ सेस, पेट्रोल-डिझेल ६ रुपयांनी महाग

पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशभरात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. याचदरम्यान, नागालँडने पेट्रोल आणि डिझेलवर कोविड-१९ सेस लावल्यामुळे इंधनदरात मोठी वाढ झाली आहे. दि. २८ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून राज्यात पेट्रोल ६ रुपये आणि डिझेल ५ रुपये प्रती लीटरने महागले आहे. यापूर्वी, आसाम सरकारने डिझेलवर ५ रुपये आणि पेट्रोलवर ६ रुपये कर वाढवला होता. नागालँडचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि वित्त आयुक्त सेंटियांगर इमचेन यांनी याची माहिती दिली. नागालँड टॅक्ससेशन ऍक्ट १९६७ (संशोधित) नुसार मिळालेल्या अधिकाराचा वापर करत राज्यपालांनी हे आदेश जारी केले आहेत. सध्याचा कर आणि सेस शिवाय कोविड-१९ सेसही लावण्यात येईल. तर लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी आसाम सरकारने मागील आठवड्यातच पेट्रोल-डिझेलवर टॅक्स लावला होता. 

चीनमुळे आज १८४ देशांना नरकयातना भोगाव्या लागताहेत - डोनाल्ड ट्रम्प

आसाममध्ये पेट्रोल ७१.६१ रुपयांवरुन ७७.४६ रुपये प्रती लीटर आणि डिझेलचे दर ६५.०७ रुपयांवरुन ७०.५० रुपये प्रती लीटर झाले आहे. आसाम मूल्य वर्धित कर अधिनियम, २००३ च्या तरतुदींनुसार मुख्य सचिव समीरकुमार सिन्हा यांनी अधिसूचना जारी करुन २२ एप्रिलला मध्यरात्री १२ पासून याची अंमलबजावणी सुरु केली आहे. कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्याने राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर इंधनाच्या किमती वाढवण्याचा दबाव आहे.

लॉकडाऊनमध्ये डाळ-तांदळाचे दर वाढले, भाज्या झाल्या स्वस्त

तर, मेघालयमध्ये एक लीटर पेट्रोल ७४.९ रुपये आणि डिझेल ६७.५ रुपयांना मिळत आहे. एका सरकारी अधिसूचनेनुसार, पेट्रोलसाठी कराचे नवीन दर ३१ टक्के किंवा १७.६ प्रती लीटर आणि डिझेलसाठी २२.५ टक्के किंवा १२.५ रुपये प्रती लीटर आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्हीवर २ टक्के सेल्स टॅक्स सरचार्ज लावण्यात आला आहे.

लॉकडाऊनमध्ये डाळ-तांदळाचे दर वाढले, भाज्या झाल्या स्वस्त