सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यातील तेल युद्धावरून कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. कच्च्या तेलाचे दर फेब्रुवारी २०१६ च्या पातळीपर्यंत खाली आले आहेत. या दोन्हीचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलिटर दरांवर झाले आहेत. मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर घसरले. पेट्रोलचे दर प्रतिलिटर ३० पैशांनी तर डिझेलचे दर प्रतिलिटर २५ पैशांनी कमी झाले. यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
इटलीतून आलेल्यांमुळेच भारतात कोरोनाचा मोठा फैलाव
पेट्रोल आणि डिझेलचे दर सोमवारीही घसरले होते. येत्या काही दिवसांमध्ये या दोन्ही इंधनांच्या दरात आणखी घसरण होण्याचे संकेत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती, सौदी अरेबिया आणि रशिया यांच्यातील तेल युद्ध याचा परिणाम तेलाच्या दरांवर होणार आहे.
''मध्य प्रदेशात सरकार पाडण्यात अजिबात रस नाही''
दिल्लीमध्ये मंगळवारी पेट्रोलचे दर प्रतिलिटर ७०.२९ रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर ६३.०१ रुपये इतका होता. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७५.९९ रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर ६५.९७ रुपये इतका होता.