पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजच्या किमती

पट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असल्याने भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. देशभरामध्ये गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये २९ पैसे प्रति लिटरने वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरामध्ये दिल्लीत १९ पैशांनी तर मुंबईमध्ये २० पैशांनी वाढ झाली आहे. दीड महिन्यातील हे सर्वात जास्त दर असल्याचे म्हटले जात आहे. 

एमआयएमचे दरवाजे आम्ही बंद केले नाहीत: प्रकाश आंबेडकर

देशामध्ये सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर सरकारी तेल वितरण कंपनीद्वारे ठरवले जातात. ज्यामध्ये इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम यांचा समावेश आहे. पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदवस वाढत चालले आहेत. दिल्लीमध्ये गुरुवारी पेट्रोलचे दर ७२.७१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ६६.०१ रुपये प्रति लिटर झाले. तर मुंबईमध्ये पेट्रोलचे दर ७८.३९ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ६९.२४ रुपये प्रति लिटर झाले आहे. 

चिटफंड प्रकरणी ओडिशा क्रिकेट असोसिएशनच्या माजी सचिवाला अटक

गेल्या आठवड्यामध्ये सौदी अरामको येथील तेल शुध्दीकरण प्रकल्पावर ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यामुळे इंधनाचं उत्पादन मोठ्याप्रमाणात कमी झाले आहे. सोमवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत २० टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल किंमत ७१ डॉलरवर गेली आहे. २८ वर्षानंतरची ही सर्वात मोठी वाढ असल्याचे सांगितले जात आहे. 

झारखंडमध्ये काँग्रेसला धक्का; अजय कुमार यांचा आपमध्ये प्रवेश